Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथील श्री कमला भवानी मंदिरात घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

0 8 9 6 7 5

करमाळा येथील श्री कमला भवानी मंदिरात घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात सुरुवात

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ११/ करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिर संस्थानचे विश्वस्त श्री. शिरीषकुमार लोणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी करमाळ्याच्या तहसीलदार मा. शिल्पा ठोकडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

घटस्थापनेनंतर सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या गजरात देवीची आरती संपन्न झाली. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक विधींची जय्यत तयारी करण्यात आली होती. माही डेकोरेशन व मराठा मंदिर डेकोरेशन यांच्या वतीने मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून, या सजावटीमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

मंदिर संस्थानचे पुजारी श्री. दादासाहेब पुजारी यांनी देवीची विधिवत पूजा मांडली. पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि आई राजा उदो उदो, सदा आनंदीचा उदो उदो!’ च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या मंगलमय धार्मिक सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे विश्वस्त, तहसीलदार मा. शिल्पा ठोकडे मॅडम, पुरोहित रविराज पुराणिक, सुशील पुराणिक, मंदिराचे पुजारी श्री. बापूराव पुजारी, विजय पुजारी, संदीप पुजारी (सर), जयदीप पुजारी, भारत सोरटे, नारायण सोरटे, अभिमान सोरटे, रामलिंग सोरटे यांच्यासह मंदिरातील सर्व मानकरी व सेवेकरी उपस्थित होते.

शारदीय नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेचा, श्रद्धेचा आणि मांगल्याचा उत्सव मानला जातो. या नऊ दिवसांत श्री कमला भवानी देवीच्या दर्शनासाठी करमाळा शहरासह परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे