Breaking
ब्रेकिंग

ॲॅमॅच्युअर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*

0 7 6 9 4 3

*ॲॅमॅच्युअर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*

राहुरी तालुका जावेद शेख

रविवार दिनांक २९ जून २०२५ ॲॅमॅच्युअर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन, महाराष्ट्राच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन हॉटेल वैशाली, सी.बी. एस. रोड, नाशिक येथे केले होते.
या सभेचे संपूर्ण नियोजन नाशिक जिल्हा मिक्स बॉक्सिंग असोसिएशन चे सचिव आनंद जाधव यांनी उत्तम प्रकारे केले.
या सभेला भारतीय मिक्स-बॉक्सिंग महासंघाचे संस्थापक महासचिव श्री. राकेश म्हसकर सर ,दुबई चे राहुल भाई, विनायक सकपाल, प्रणाली पाटील, योगेश पाटील हे सर्व
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

वार्षिक सर्वसाधारण सभा ॲॅमॅच्युअर मिक्स बाॅक्सिंग असोसिएशन चे कार्याध्यक्ष प्रशांत मोहिते सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
ही सर्व साधारण सभा अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली.मिक्स बॉक्सिंग खेळाचा प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त कसा प्रचार ,प्रसार व विकास कसा होईल यावर चर्चा झाली.

या सभे मध्ये बिनविरोध महाराष्ट्र राज्य ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली .ती पुढीलप्रमाणे

१) कार्याध्यक्ष – प्रशांत मोहिते (रायगड जिल्हा)
२)उपाध्यक्ष -निलेश लिंबे (कोल्हापूर जिल्हा)
३) सचिव – नारायण कराळे (अहिल्यानगर जिल्हा)
४) टेक्निकल डायरेक्टर -सागर शेलार(पालघर जिल्हा)
५) टेक्निकल अध्यक्ष -संदेश नाईक(मुंबई जिल्हा)
६)महाराष्ट्र प्रशिक्षक- राजू मोरे (मुंबई जिल्हा)
७) डेव्हलपमेंट इन्चार्ज – रवी बारा पात्रे(नागपूर जिल्हा)
८) आयोजन समिती अध्यक्ष -गणेश पेरे(बुलढाणा जिल्हा)
९) आनंद जाधव (नाशिक जिल्हा)
१०)किसन शिंदे (पुणे जिल्हा)
११) गणेश पाटील (सांगली जिल्हा)
१२) आकाश राणे(अमरावती जिल्हा)
१३) अनिल साहारे(गोंदिया जिल्हा)
१४)अमित पंत(मुंबई सब अर्बन)
१५)नासीर मुलांनी(ठाणे जिल्हा)
१६) स्वप्निल सोनवणे(नवी मुंबई)
१७)रोहन शेवाळे(सचिव -रोहा तालुका
१८) विनोद दाढें( नांदेड जिल्हा)
ही सर्व राज्य कार्यकारिणी मिक्स बॉक्सिंगचे संस्थापक श्री.राकेश म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या व्यतिरिक्त या सभेत टेक्निकल डायरेक्टर म्हणून विकास भोईर सर यांची बिनविरोध निवड भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघात करण्यात आली.

या सर्व निवड झालेल्यांना भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षा ना.आदिती ताई तटकरे (मंत्री-महिला व बाल विकास,महाराष्ट्र राज्य) , ॲॅमॅच्युअर मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत भाई तटकरे साहेब (आमदार) व महासंघाचे चेअरमन सुरज जी मगर साहेब यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे