मॉर्निंग वॉक ग्रूप धुळे रोड अमळनेर यांनी केला योगा दिवस साजरा*

*मॉर्निंग वॉक ग्रूप धुळे रोड अमळनेर यांनी केला योगा दिवस साजरा*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- धुळे रोड अमळनेर येथील मॉर्निंग वॉक ग्रूप मधील सदस्य नेहमी आरोग्याची काळजी घेत असतात,तसेच ग्रूप मधील सदस्य नेहमी समाजहिताची कामात सहभाग घेऊन जयंती,ग्रूप मधील सदस्य यांचे वाढदिवस,वृक्षारोपण,या सारखे कार्यक्रम आयोजित करत असतात,आज सुद्धा या ग्रुप मधील सदस्य यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सकाळी सहा वाजता धुळे रोड जवळील 80 फुटी रोडवर सर्वांनी एक तास योगा करून अनोख्या पद्धतीने योगा दिवस साजरा केला,या प्रसंगी,जगदीश पाटील सर,देसले आप्पा, डॉ.प्रदीप पाटील,पवार अप्पा,शिवदास शेटे मेजर,रामकृष्ण पाटील,दिलीप अप्पा,विजय पाटील,किशोर पाटील सर,ठाकरे सर ,शिवदाम शेटे मेजर आणि रामकृष्ण पाटील आणि इतर सभासद या सर्व सेवा निवृत्त नागरिक यांनी एकत्र येत योगा केला.