Breaking
ब्रेकिंग

कल्याण रोडला औदूंबर मठात धर्मनाथ बीज निम्मित विविध कार्यक्रम

0 3 9 0 7 2

कल्याण रोडला औदूंबर मठात धर्मनाथ बीज निम्मित विविध कार्यक्रम

प्रतिनिधी :  महेश कांबळे

नगर-    येथील नवनाथ ध्यानयोग सत्संग मंडळाच्या वतीने औदूंबर मठाततील मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मंदिर,साईराम सोसायटी,नगर कल्याण रोड,शिवाजी नगर येथे नाथभक्त दत्ताराम महाराज चौकटे यांच्या मार्गदर्शनाने धर्मनाथ बीज उत्सव निमित्त विविध कार्यक्रम ३१ जानेवारीला आयोजित करण्यात आले आहेत असे मच्छिन्द्रनाथ महाराज चौकटे यांनी सांगितले .

उत्सवाचे हे२७वे वर्ष आहे कार्यक्रमाचा प्रारंभ२१ जानेवारीस करण्यात आला असून सांगता३१जानेवारीस होणार आहे.या ११ दिवसीय कार्यक्रमात रोज सकाळी ८ ते  १०  महाअभिषेक, सकाळी ७ते८ गणपती अथर्वशीर्ष,विष्णू सहस्त्र नाम पठण गोरक्षनाथ चौकटे करणार असून ८ते १० नवनाथ भक्तिसार सामुदाईक पारायण व आरती नाथभक्त ऋषिकेश बोजा यांच्या अधिपत्याखाली होत आहे तर दुपारी ३ ते ४ हरीपाठ व भजन प्रयागाबाई शिंदे,हिराबाई बाचल,प्रमिलाताई वाव्हळ व संत बाळाजी बुवा महिला भजनी मंडळ(दातरंगे मळा)करत आहे व रोज रात्री७ ते१०दत्त कथा नाम यज्ञ, यावर कथा प्रवक्ते नवनाथा कथाचार्य मच्छिंद्रनाथ महाराज चौकटे करत आहे, नंतर रोज महाप्रसाद होत आहे .

२९ जानेवारी रोजी ग्रंथ मिरवणूक पालखी सोहळा दुपारी ४ ते ६ व ३१ जानेवारीस रोजी धर्मनाथ बीज मुख्य उत्सव होईल यावेळी दत्तकथा सांगता सकाळी ९ ते १२ होईल व नंतर महाप्रसाद भंडारा होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे .

कार्यक्रमाचे निमंत्रक जगदीश गुंगे,संजय गुगळे,सुधीर जाधव,नवनाथ सत्संग मंडळाचे अध्यक्ष आशिष नाळके,उपाध्यक्ष ऋषीकेश बोजा,सचिव गोरक्ष चौकटे,सहसचिव ओम जाधव ,खजिनदार सचिन बगाडे आदींसह नवनाथ ध्यानयोग सत्संग मंडळाच्या वतीने सर्व कार्यक्रमांकाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे