Breaking
ब्रेकिंग

रविवार दिनांक २८ रोजी अहिल्यानगर येथे एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

0 8 6 7 0 2

रविवार दिनांक २८ रोजी अहिल्यानगर येथे एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर:-जी एच रायसोनी मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धा नगर येथील सुयोग मंगल कार्यालय, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर येथे रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार असून या स्पर्धेत अंदाजे ४०,०००० रुपयांची बक्षिसे खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून वाटण्यात येणार आहेत. खुला गट,१९ वर्षाखालील गट, १४ वर्षाखालील गट, ९ वर्षाखालील गट, ७ वर्षाखालील गट, ज्येष्ठ खेळाडू गट व मुलींचा गट अश्या गटांमध्ये या स्पर्धेत बक्षीस वाटण्यात येणार आहेत. नगर जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी सहभाग नोंदवा असे आव्हान प्रशांत गंगेकर यांनी केले आहे.

प्रशांत गंगेकर चेस अकॅडमी ने ही स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेला अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेची मान्यता असल्याचे अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.
स्विस लीग पद्धती मध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये अंदाजे सात फेऱ्या होतील. या फेऱ्यांमधून विविध गटातील विजेते हे ठरवले जातील.

अधिक माहितीसाठी व स्पर्धेतील सहभागासाठी खेळाडूंनी श्री यशवंत बापट ९३२६०९२५०१ व श्री पारुनाथ ढोकळे ९८५०७०४२६८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गंगेकर बुद्धिबळ अकॅडमी ने केले आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे