Breaking
ब्रेकिंग

खडांबे येथील श्री शाहू विद्या मंदिरचा विद्यार्थी साद पठाण यांस जिल्हास्तरीय तायक्वान्दो स्पर्धेत सुवर्ण पदक

0 8 9 6 7 5

खडांबे येथील श्री शाहू विद्या मंदिरचा विद्यार्थी साद पठाण यांस जिल्हास्तरीय तायक्वान्दो स्पर्धेत सुवर्ण पदक

पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड!

राहुरी तालुका जावेद शेख

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने श्रीगोंदा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय तायक्वान्दो स्पर्धेत राहूरी तालुक्यातील खडांबे येथील श्री शाहू विद्या मंदिर चा विद्यार्थी साद इम्रान पठाण याने जिल्हा स्तरीय सुवर्ण पदक पटकावले आहे.
साद पठाण याची पुढील पुणे विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
साद यांस प्राचार्य अप्पासाहेब शिंदे, क्रीडा शिक्षक राहुल जाधव, सर्व शिक्षक तसेच लक्ष्मण हरिश्चंद्रे,वांबोरी येथील के. टायगर तायक्वान्दो अकॅडमी चे अमोल जऱ्हाड सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे,सरपंच अण्णासाहेब माळी उपसरपंच अमोल हरिश्चंन्द्रे, वांबोरी येथील के. टायगर तायक्वान्दो अकॅडमी चे अमोल जऱ्हाड सर, जेष्ठ पत्रकार रफीक भाई शेख, हसनापूरचे उपसरपंच राजूभाई शेख आदींनी साद पठाण याचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे