प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी निवड

प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी निवड
अहिल्यानगर : पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार) व उत्तर महाराष्ट्र सचिव, भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा. योगेश दिनकर गोसावी आणि जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे (अप्पा)यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे सर हे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जैवविविधता जतन, तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण व विकासाच्या विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमी कडून ज्ञानेश्वर बनसोडे सर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, पाणी संवर्धन आणि जनजागृतीसाठी व्यापक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.


