अखेर अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या मागणीला यश ; रस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसविले
अखेर अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या मागणीला यश ; रस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसविले
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
यशवंत नगर शहापूर-केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून विद्युत खांबावर स्ट्रीट लाईट नव्हत्या रात्रीच्या वेळी या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अंधाराचा सामना करावा लागत होता.या रस्त्यावर स्ट्रीट नसल्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा छोटे-मोठे अपघात व घटना सुद्धा घडलेल्या आहे.यशवंत नगर, शहापूर-केकती गाव व अश्या बरेच छोट्या मोठ्या गावाला जोडणारा हा एक मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची सतत वर्दळ असते या ठिकाणी या रस्त्यावर विद्युत खांब तर होते पण मात्र एकाही खांबावर स्ट्रीट लाईट नव्हती तरी या बाबत अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने माननीय आमदार श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांना निवेदन देण्यात आले साहेबांनी संघटनेचे निवेदनाची दखल घेतली व आज यशवंत नगर,शहापूर-केकती, शेळके वस्ती गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अंधाराचा प्रश्न मिटला.मेहतर समाज संघटनेच्या निवेदनावर दखल घेतल्याबद्दल संघटनेच्या वतीने आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब, शहापूर केकती गावातील सरपंच सोनु भाऊ खोमणे ग्रामसेवक पुंड भाऊसाहेब यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, सरपंच सोनु भाऊ खोमणे,जिल्हा सचिव आकाश ठाकुर,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे,गोविंद घोडके, सुरेश नाईक,रामजी मिश्रा, दिलिप सुर्यवंशी गावातील आदी नागरीक उपस्थित होते.


