मारवड या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार उत्साहात संपन्न

मारवड या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार उत्साहात संपन्न
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. आबासाहेब जयवंतराव पाटील होते.सभेत अजेंडानुसार एकूण ०१ ते ०८ मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अध्यक्षांनी संस्थेचा वार्षिक अहवाल तसेच आगामी योजनांची माहिती सभेपुढे मांडली. सचिव श्री. देविदास पाटील यांनी मागील तीन वर्षांचा ऑडिट अहवाल आणि नवीन अंदाजपत्रक वाचून दाखवले व त्यास सभेची मंजुरी मिळाली.
ही सभा अत्यंत शिस्तबद्ध आणि चर्चासत्रात्मक वातावरणात पार पडली. मारवड, गोवर्धन, बोरगाव, प्र. डांगरी, करणखेडे, कलाली, सात्री, बोहरे येथील सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे महिला सभासदांची उपस्थिती लक्षणीय होती.अध्यक्षांनी सर्व सभासदांचे आभार मानून सभा समाप्त केली.