रथ सप्तमी दिनानिमित्त करमाळा बस स्थानक येथे प्रवासी दिन उत्साहात साजरा
रथ सप्तमी दिनानिमित्त करमाळा बस स्थानक येथे प्रवासी दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ६/ करमाळा बस स्थानक येथे रथ सप्तमी दिनानिमित्त प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी करमाळा आगार प्रमुख वीरेंद्र होनराव, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख माधुरी परदेशी यांच्या हस्ते तिळगुळ व करमाळ्याची प्रसिद्ध रेवडीचे प्रवाशांना वाटप करण्यात आले. यावेळी करमाळा आगारातील स्वच्छता पथकाचे सदस्याचे व उत्तम कामगिरी केलेल्या वाहतूक कर्मचारी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी बलभिम दैन, वाहतूक निरीक्षक कर्णराज मुसळे, हनुमंत बिनवडे, बस चालक संतोष उदमले, नानासाहेब शिंदे, प्रविण कसाब, नितीन कावळे, अविनाश काटकर, नानासाहेब नलवडे, श्री. ढोबे, शहाजी वीर, वाहक मुरलीधर बारखकर, प्रशांत आवटे, सचिन बिरंगळ, श्रीकांत माने, स्वच्छता कामगार दिपक शिंदे, सोमनाथ शिरोळे याबरोबरच ग्राहक पंचायतीचे माधुरी परदेशी, मैत्री पाटील, पत्रकार अशपाक सय्यद, संभाजी कोळेकर, वंचित आघाडीचे यशपाल कांबळे, तसेच करमाळा आगारातील कामगार, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी करमाळा आगारातील बस सेवेच्या त्रुटी समस्या प्रवाशाच्या अडचणी बाबत सादर वादक चर्चा करण्यात आली यावेळी प्रवाशांच्या समस्यांचा पाढा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आगर प्रमुखकडे मांडण्यात आला. यावेळी बस सेवेमध्ये असणाऱ्या कमतरता व त्रुटी दूर त्यांनी करून त्यांच्याही अडचणी ग्राहाकपंचायत समोर मांडून जास्तीत जास्त उत्तम सेवा प्राप्त परिस्थितीत देण्याचे आश्वासन आगारप्रमुख वीरेंद्र होनराव यांनी दिले. यावेळी बस कमतरता व पुरेसा कर्मचऱ्या अभावी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचे अखिल भारतीय ग्राहकपंचायत तर्फे सांगण्यात आले. पत्र व्यवहार करून सुधारणेबाबत बस उपलब्ध करून देण्याची मागणी व प्रयत्न करू असे ग्राहकपंचायतीतर्फे सांगण्यात आले. यावेळी आगार प्रमुख वीरेंद्र होनराव व ग्राहक पंचायतीच्या माधुरी परदेशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर आभार बलभीम दैन यांनी मानले.