दत्तकला आयडियल स्कूल अ़ॅन्ड ज्यूनिअर कॉलेजची सलग 11 वर्षे उज्वल यशाची परंपरा कायम; इयत्ता 10 वी चा 100% निकाल*

*दत्तकला आयडियल स्कूल अ़ॅन्ड ज्यूनिअर कॉलेजची सलग 11 वर्षे उज्वल यशाची परंपरा कायम; इयत्ता 10 वी चा 100% निकाल*
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १३/ दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला आयडियल स्कूल अ़ॅन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं. 1 चा इयत्ता 10 वी चा निकाल 100 टक्के लागला असुन सलग 11 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे.
1) खाटमोडे राज पांडुरंग:-95.40%
2) बाबर आर्या अप्पासाहेब:-93.20%
3) देशमुख प्राची प्रशांत:- 88.80%
वाशिंबे केंद्रात सेमी इंग्रजी माध्यमातून कुमार राज पांडुरंग खाटमोडे याने 95.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच कुमार राज पांडुरंग खाटमोडे या विद्यार्थ्याने गणित व विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात अनुक्रमे 100 पैकी 98 व 96 गुण मिळवले आहेत. कुमारी आर्या अप्पासाहेब बाबर या विद्यार्थिनीने हिंदी विषयात 100 पैकी 92 गुण मिळवले. तसेच प्राची प्रशांत देशमुख व राज पांडुरंग खाटमोडे या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात 100 पैकी 94 गुण मिळाले आहेत. प्रशालेचे तब्बल 7 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह 2 विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. सलग 11 वर्षापासून या शाळेचा निकाल 100% लागत आहे. यासाठी योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला जातो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून पेपर सोडवून घेतले जातात हे या यशाचे गुपित आहे.
या यशासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शना बरोबर दर महिन्याला टेस्ट सिरीज, गेस्ट लेक्चर, पेपर संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केले जाते. या यशाबद्दल पालक वर्गातून आनंद व कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रामदास झोळ सर प्राचार्य श्री. विजय मारकड सर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.