Breaking
ब्रेकिंग

गुंडेगावामध्ये कचऱ्याचे साम्राज्य ; कचरा गाडी कोणी फिरताना बघितली का?

0 8 6 7 4 8

गुंडेगावामध्ये कचऱ्याचे साम्राज्य ; कचरा गाडी कोणी फिरताना बघितली का?

वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

सध्या पावसाळा सुरू असूनही नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे ग्रामपंचायत प्रशासन कचरा व्यवस्थापनात उदासीनता बाळगत आहे. गावात कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावाला कचरा गाडी आणण्यात आली होती पण ती पहिल्याच दिवसापासुन बंद स्थितीत असुन तीन वर्षांपासून तिचे चाक मातीत रुतलेले आहे.तसेच गावात कचरा कुंड्या शोधूनही सापडणार नाहीत.एकीकडे शासन स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत स्वच्छतेवर खर्च करण्यासाठी सांगते तरी येथे स्वच्छतेचे कुठलही काम होत नाही.
उन्हाळ्यानंतर कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे असते. मात्र ही कामे अजून करण्यात आलेली नाहीत. परिणामी गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत.प्लास्टिक, कुजलेले अन्न आणि इतर कचरा जमा झाला आहे. मात्र, स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत पूर्णपणे उदासीन आहे. बस स्टॉप, मंदिर परिसरात सर्वत्र कचरा साचलेला असून पाऊस सुरू असल्यामुळे तेथे पाणी साचले आहे. यामुळे रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्न निर्माण होऊन या परिसरात रोगराई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
शासनाकडून स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते पण ते कुठे गेले याचा प्रश्न आहे. नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान २०१९ पासुन संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले होते.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ,सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यात ही आले.याकामी स्वच्छ भारत अभियानांतर्गत, ‘घंटागाडी’ (कचरा गाडी) ही कचरा उचलण्याची एक महत्त्वाची सुविधा म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला ही गाडी देण्यात आली होती.कारण ही गाडी नियमितपणे घरोघरी जाऊन कचरा गोळा करुन परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करीन अशी अपेक्षा होती परंतु स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचे एक महत्वाकांक्षी अभियान गुंडेगाव येथे नावालाच पहायला मिळत आहे.

गुंडेगाव ग्रामपंचायतच्या पटांगणात या कचरा गाडीचे स्मारक म्हणून स्थापना करावी जेणेकरून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना त्याची जाणीव होईल की आपल्या गुंडेगावला सुद्धा कचरा गाडी मिळाली होती.स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचे एक महत्वाकांक्षी अभियान आहे.ज्याचा उद्देश भारताला स्वच्छ बनवणे आहे.कचरा व्यवस्थापन स्वच्छ भारत अभियानामध्ये कचरा व्यवस्थापनाला खूप महत्त्व दिले जाते.घंटागाडी कचरा उचलण्याची आणि तो योग्य ठिकाणी नेण्याची सोय करते, ज्यामुळे परिसरातील कचरा साठून राहत नाही. – 

विकास शिर्के – गुंडेगाव नागरिक

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे