श्री कमलादेवी मंदिरामध्ये २,००० महिलांच्या उपस्थितीत श्री दुर्गा सप्तशती पाठ पठण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री कमलादेवी मंदिरामध्ये २,००० महिलांच्या उपस्थितीत श्री दुर्गा सप्तशती पाठ पठण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २२/ करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिरामध्ये आज दि. २२/०८/२०२६ रोजी दुर्गा सप्तशती पाठ पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पाच पटनास जवळपास 2000 महिला भक्तांनी सहभाग नोंदवला. अत्यंत भक्तीमय वातावरणामध्ये आई जगदंबा कमलादेवी चरणी सर्व महिला भाविकांनी नतमस्तक होऊन दुर्गा सप्तशती पाठ पठण केले.
यावेळी श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीचे सचिव श्री अनिल पाटील व सौ. ॲड. लता पाटील यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, विश्वस्त सुशील राठोड, डॉक्टर रोहन पाटील, राजेंद्र वाशिंबेकर, तसेच मंदिर पुरोहित श्याम पुराणीक, मंदिर पुजारी रत्नदीप पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे, संजय कदम, सौ. कदम, वीर सर, वीर मॅडम, सर्व मंदिरातील पुजारी, सेवेकरी, मानकरी तसेच श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ इं. उपस्थित होते.

हा दुर्गा सप्तशती पाठ पठण सोहळा अतिशय भव्य दिव्य असा हा धार्मिक कार्यक्रम विश्व कल्याणासाठी घेण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.


