Breaking
ब्रेकिंग

आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित ,जय बजरंग प्राथमिक विद्यालयात घनकचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती

0 8 9 6 7 5

आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित ,जय बजरंग प्राथमिक विद्यालयात घनकचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती

 

अहिल्यानगर : स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती या घटकाच्या अनुषंगाने आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग प्राथमिक विद्यालय, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर येथे विद्यार्थ्यांसाठी घनकचरा व्यवस्थापन या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून *श्रीमती.सुवर्णा वाघ मॅडम* यांनी आपल्या व्याख्यानातून. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, कचऱ्याचे विविध प्रकार, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी, ‘७ आर’ संकल्पना तसेच कचऱ्याचा उगमापासून ते अंतिम व्यवस्थापनापर्यंतचा प्रवास याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, कचऱ्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रण करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाची संकल्पना समजून घेण्यास मदत झाली. तसेच स्वच्छता ही केवळ वैयक्तिक सवय नसून ती सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणीव करून देण्यात आली. पर्यावरणाचे संरक्षण, प्रदूषणावर नियंत्रण आणि स्वच्छ परिसराची निर्मिती यांसाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास विद्यालयाचे *मुख्याध्यापक* *श्री. अमोल क्षीरसागर* यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल मोरे यांनी केले, तर आभार श्री.
गणेश शिंदे सर यांनी मांडले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे