Breaking
ब्रेकिंग

लाईटचे डीपी बॉक्स उघडेच ; विद्युत वितरण महामंडळाचे दुर्लक्ष

जीवीत हानी झाल्यास जबाबदार कोण ? उमेश लोंढे यांनी दिले निवेदन

0 8 6 5 1 5

लाईटचे डीपी बॉक्स उघडेच ; विद्युत वितरण महामंडळाचे दुर्लक्ष

जीवीत हानी झाल्यास जबाबदार कोण ? उमेश लोंढे यांनी दिले निवेदन

एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क

पुणेः पिंपरी चिंचवड व परिसरातील डीपी बॉक्स उघडे असून यावर कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्याने कोणतीही जीवीत हानी होवु नये यासाठी पुणे शहर दलचे विभाग नाईक व सामाजिक कार्यकर्ते उमेश लोंढे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे
कार्यकारी अभियंता (MSEB) आणि महानगरपालिकेचा विद्युत वितरण विभाग यांना निवेदन दिले आहे .

निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याला सुरुवात होऊन देखील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ आणि अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळणे सुरूच आहे. अनेक ठिकाणी लाईटच्या खुले डीपी बॉक्स असून त्यांवरती कोणतेही सुरक्षा यंत्रणा नाही.”पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी दिसून येते की, लाईटचे डीपी बॉक्स धोकादायक रित्या उघडेच आहेत . हे बॉक्स सुरक्षीत रित्या झाकलेले आढळून येत नाहीत.पिंपरी, चिखली, निगडी, चिंचवड अशा अनेक ठिकाणी हे उघडे डीपी बॉक्स आढळून आले आहेत. यामुळे जीवीतहानी होवु शकते .जर एखादयाचा जीवास धोका निर्माण झाला तर यास कोणास जबाबदार धरण्यात येईल ?

क्षेत्रीय विद्युत कार्यकारी अभियंता व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, (विद्युत विभाग) यांनी याबाबतीत वेळीच उपाययोजना करून सुरक्षा संबंधित सर्व बाबींची पूर्तता करून होणारा अपघात टाळावा . ज्या ठिकाणी वीज चोरी करून लाईटचे आकडे टाकण्यात आले आहे असे ठिकाणी त्वरित बंद करून त्यावर सील करावे, ज्यामुळे पावसाळ्यात पाण्याद्वारे विद्युत वहन होऊन होणारा मोठा अपघात टाळता येऊ शकतो ज्यामध्ये निष्पाप लहान मुले, सायकल स्वार, किंवा पादचारी व्यक्तींचा प्रामुख्याने समावेश असतो; अशा सर्व ठिकाणी अंधार असल्याने या ठिकाणी त्वरित काही गोष्टी निदर्शनास येत नाहीत . महापालिका विद्युत विभाग आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ यांनी संयुक्तपणे अशी ठिकाणे शोधून त्वरित यावर योग्य ती उपाययोजना व कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा .
“नागरिकांनी देखील सावधानता बाळगावी; शक्यतो पावसाळ्यात अशा ठिकाणी विद्युत वहन करणाऱ्या गोष्टींसाठी उपाययोजना करावी.”

“नागरिकांनी चोरीची वीज वापरू नये. त्याचप्रमाणे लोखंडी टपऱ्या, पाण्याने भरलेले खड्डे, लोखंडी पत्रे, भिंती, झाडे अशा ठिकाणाहून विद्युत वहन होऊन अपघात होण्याची शक्यता सर्वात जास्त असते अशा ठिकाणांना (Identify & Mark) निर्देशित करून स्वतःची काळजी घेण्यात यावी.त्यामध्ये विजेच्या तारा, खुल्या तारा घराजवळून, पाण्याचा जवळून गेले असल्यास त्यांना विद्युत प्रवाह बंद करून दूर व सुरक्षित ठिकाणी बांधावे.जर यानंतरही उपायोजना न केल्यास संबंधित अधिकारी व्यक्तीस जबाबदार धरण्यात येईल असे उमेश लोंढे यांनी निवेदनात म्हटले आहे .

या निवेदनावर संबंधीत विभाग काय ठोस कारवाई करणार यावर नागरिकांचे लक्ष आहे .

          ( उमेश लोंढे )

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे