Breaking
ब्रेकिंग

खतांची कृत्रीम टंचाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा …अन्यथा – – – आंदोलन करणार … .

शिवसेना प्रमुख सुरेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

0 7 6 9 4 1

खतांची कृत्रीम टंचाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा …अन्यथा – – – आंदोलन करणार … .

शिवसेना प्रमुख सुरेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

वि . संपादक : पंकज पाटील, अमळनेर

अमळनेर तालुक्यात खतांची कृत्रीम टंचाई करणारे खत विक्रेता ,दुकानदार ,वितरक यांच्यावर कार्यवाही करून अमळनेर तालुका शेतकी संघ व अमळनेर तालुका फूट सेल यांना तात्काळ खत युरीया व इतर खते उपलब्ध करण्यासाठी जळगावचे मा . जिल्हाधिकारी यांना
अमळनेर तालुक्याचे शिवसेना प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी निवेदन दिले .

सदर निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात युरीया खताची कृत्रीम टंचाई दाखवून खत विक्रेता दुकानदार, वितरक, व संबंधीत भरारी पथक यांनी संगनमत करून तालुक्यात युरीया खताची व इतर खतांची कृत्रीम टंचाई निर्माण केली असुन व्यापारी भाव वाढवून शेतकरी राजास अडचणीत आणून लुट, अडवणूक करीत आहेत. सतत आवर्षण प्रवण क्षेत्र अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त असून देखील अमळनेर तालुक्यात दरवर्षी रासायनिक खतांची टंचाई भासवून खाजगी कृषी केंद्र व्यापारी यांनी कायम कृत्रीम टंचाई दाखवलेली आहे. सबंधीत आपल्या आधिपत्याखालील आधिकारी यांनी खताचा मोठा पुरवठा देऊन देखील खत विक्रेता दुकानदार, वितरक कृत्रीम टंचाई दाखवून ज्यादा दराने खत विक्री करून बळीराजाची फसवणूक करून स्वःताच्या फायदयाठी बळीराजाला आर्थिक संकटात टाकतात.

सबब अमळनेर तालुक्यातील सर्व विकास सोसायट्या, अमळनेर तालुका शेतकी संघ, अमळनेर तालुका फुट सेल सोसायटी, शासनाच्या सहकारी क्षेत्रातील संस्थाना ज्यादा पुरवठा आपल्या आदेशाने झाल्यास बळीराजास ज्यादा दराने खत खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही . संबंधीत प्रशासनाने याची तात्काळ दखल न घेतल्यास खत पुरवठा विक्रेता दुकानदार, वितरक व संबंधीत आधिकारी यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले जाईल . आपल्या स्तरावरून तात्काळ खत विक्रेता, वितरक यांच्या दुकान व गोडावूनची तपासणी करून बळीराजास न्याय दयावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहेत . यावेळी शेतकरी प्रतिनिधी रविंद्र पाटील  हेडावे , प्रविण गोसावी नगाव ,अनिल पाटील रढावण राजोरे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

सदर निवेदन मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुबंई, मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगांव जिल्हा, मा.ना.श्री माणीकराव कोकाटे कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य , मा. आयुक्त नाशिक विभाग नाशिक, मा. जिल्हाकृषी अधिकारी, जळगांव, मा. उपविभागीय अधिकारी अमळरनेर,मा. उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर , मा.तालुका कृषी अधिकारी, अमळनेर यांना मेलद्वारे कळविण्यात आले आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे