नुजीवीडू सीड्स कंपनीचा “सुबिज किसान मेळावा” अमळनेर येथे यशस्वीरित्या पार पडला

नुजीवीडू सीड्स कंपनीचा “सुबिज किसान मेळावा” अमळनेर येथे यशस्वीरित्या पार पडला
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर – बियाणे क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या नुजीवीडू सीड्स लिमिटेड यांच्या वतीने आज अमळनेर येथे “सुबिज किसान मेळावा” संपन्न झाला. या कार्यक्रमात मका व कापूस पिकांवरील उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांची सखोल माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
मका पिकासाठी कॅप्सूल व क्रांती हे उच्च दर्जाचे वाण तसेच कापसासाठी आशा व विजेता या वाणांची ओळख करून देण्यात आली. या वाणांमुळे शेतकऱ्यांना उत्पादन व आर्थिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले.
या मेळाव्याला नुजीवीडू सीड्स चे विभागीय अधिकारी श्री. रजत सांगळे, जिल्हा विक्री अधिकारी श्री. गोविंदा पाटील व श्री. गोपाल काकडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना योग्य लागवड पद्धती, तांत्रिक माहिती व उत्पादन वाढीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी अमळनेर तालुका प्रतिनिधी श्री. मनोज पाटील व श्री. राहुल सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा मेळावा शेतकऱ्यांसाठी माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरला असून भविष्यातील शेतीच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल, असे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.