Breaking
ब्रेकिंग

वडारवाडी रस्ता भूमिपूजन समारंभ अक्षय कर्डिले यांच्या हस्ते संपन्न

0 3 8 9 2 2

वडारवाडी रस्ता भूमिपूजन समारंभ अक्षय कर्डिले यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी : संवेद वायकर

भिंगार : नगर तालुक्याच्या भिंगार भागातील मौजे वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालय पासून ते शेळके वस्ती गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे भूमिपूजन समारंभ मा. श्री.अक्षय शिवाजीराव कर्डिले जिल्हाध्यक्ष भा.ज.पा युवा मोर्चा अहिल्यानगर यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी भाजपा शहर-जिल्हा उपाध्यक्ष,बेलेश्वर कन्स्ट्रक्शन चे संचालक महेश भाऊ झोडगे,पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे,शहापूर केकती गावातील सरपंच सोनु खोमणे, माजी सरपंच विजय खोमणे, ग्रामपंचायत सदस्य सौ.कीरण आळकुटे,प्रकाश घोरपडे, सौ.कांबळे ताई,दरेवाडी गावातील सरपंच अनिल करांडे,सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाघमारे,प्रदिप वावरे,बाळासाहेब तागळकर, मनोज बागडी, राकेश घावरी, प्रविण आरू,सचिन वाल्मिकी, मनोज बिडलान उपस्थित होते .

शहापूर-केकती गावातील विकासकामांसाठी आमदार श्री. शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी २ कोटींचा निधी मंजूर करून दिला आहे .

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे व सर्व पदाधिकारी यांनी वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा घेवून सदर रस्त्याच्या कामासाठी व रस्त्या अभावी लोकांना होणाऱ्या त्रासासाठी संबंधित प्रशासनास निवेदन दिले आहेत . मा . आ . श्री शिवाजी कर्डिले यांना संपर्क करून पाठपुरावा केला आहे .

आज सदर रस्त्याचे भूमिपूजन अक्षय कर्डिले यांच्या हस्ते झाले आणि संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले . संघटनेने अनेक सामाजिक कार्य करून नागरिकांना मदत केली आहे .

भूमिपुजन प्रसंगी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे यांच्या हस्ते अक्षय दादा कर्डिले यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालय पासून ते यशवंत नगर,शेळके वस्ती,केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यासाठी माननीय आमदार श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे, जिल्हा सरचिटणीस आकाश ठाकुर,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,मानूर ग्रामपंचायत (जि.बीड)सदस्य संजय ढाकणे,सामाजिक कार्यकर्ते गोविंद घोडके, विकास पंडित,कीशोर उबाळे,सुरेश नाईक,धिरज बैद,मोरे मेजर, प्रशांत बचाटे,प्रवीण बचाटे,अनिल साळवे,दिपक चोहान, रोहित चिंडालिया, राकेश बागडी, मिलिंद बचाटे व शहापूर-केकती,बाराबाभळी,वडारवाडी, दरेवाडी या गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक,तसेच यशवंत नगर,साई नगर, शहापूर-केकती शेळके वस्ती येथील महिला व सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 9 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे