मेहनत घेण्याची तयारी ठेवल्यास आयुष्यात सर्व काही शक्य : प्रवर अधीक्षक विकास पालवे
स्नेहबंध फौंडेशनतर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
मेहनत घेण्याची तयारी ठेवल्यास
आयुष्यात सर्व काही शक्य : प्रवर अधीक्षक विकास पालवे
स्नेहबंध फौंडेशनतर्फे जिल्हास्तरीय निबंध
स्पर्धेचे पारितोषिक वितरण
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर – आपण गरीब घरातून, ग्रामीण भागातून आलो आहोत हा न्यूनदगंड मनातून काढून टाका. योग्य वयात योग्य वेळी मेहनत घेणे आवश्यक आहे.
मेहनत घेण्याची तयारी ठेवल्यास आयुष्यात सर्व काही शक्य आहे, असे प्रतिपादन डाकघरचे प्रवर अधीक्षक विकास पालवे यांनी केले.
स्नेहबंध’ सोशल फौंडेशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, सेवानिवृत्त प्राचार्य एकनाथ जगताप, सचिन पेंडुरकर निशांत पानसरे, पोस्टाचे अजिंक्य काळे, संकेत शेलार आदी उपस्थित होते.
प्रवर अधीक्षक पालवे म्हणाले, कुठलेच स्वप्न मोठे नसते त्यासाठी स्वतःवर विश्वास मेहनत घेण्याची तयारी हवी. विद्यार्थ्यांनी आज कष्ट केल्यास उद्या त्याचे फळ निश्चितच चांगले मिळेल. पालकांनी आपल्या मुलां मधील क्षमता ओळखून त्यांच्या कार्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे. मुलांना जे काही चांगले देत आहेत ते मुलांना द्या. पालकांकडून मुलांना प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाल्यास मुलं नक्कीच त्याचे संधीत रुपांतर करतील.
स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे व त्यांचे सहकारी समाजाप्रति बांधिलकी म्हणून चांगले सामाजिक काम करत आहेत. या कार्यासाठी आमची काही मदत लागली तर निश्चितच सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य एकनाथ जगताप यांनी केले. डॉ. उद्धव शिंदे यांनी कार्यक्रम यांनी सूत्रसंचालन तर आभार अजिंक्य काळे यांनी मानले.
मुलांमध्ये दडलेले टॅलेंट शोधण्यासाठी निबंध स्पर्धा
स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, आजच्या मोबाईलच्या जगात विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता कमी होत आहे. त्यांना लिहिते करण्यासाठी त्यांच्यात दडलेले टॅलेंट शोधण्यासाठी ही निबंध स्पर्धा आयोजित केली. स्नेहबंधच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, अशा विविध स्पर्धा घेण्यात येतात. प्रत्येक स्पर्धांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो.
निबंध स्पर्धेतील विजेते
प्राथमिक गट : प्रथम : मंजिरी प्रविण मुठे (इ. ५ वी, महर्षी ग. ज. चितांबर विद्या मंदीर), द्वितीय : शर्वरी ज्ञानदेव कुताळ (इ. ५ वी श्रीमती अॅबट मायादेवी हायस्कुल, भिंगार), तृतीय : श्रध्दा केशव टकले (इ.४ थी स्वातंत्र्य सैनिक जानकीबाई कवडे प्रशाला, आलमगीर). माध्यमिक गट : सेजल ज्ञानेश्वर दळवी (इ.८ वी जय बजरंग विद्यालय सावेडी), द्वितीय : श्रेया रावसाहेब वायभासे (इ.७ वी कै. दामोधर विधाते प्राथ. विद्यालय, सारसनगर), तृतीय : भूमिका अनिल हिवाळे (इ.७ वी, महाराणी ताराबाई कन्या विद्यालय, केडगाव), तृतीय : कृष्णा श्रीनिवास शिरसाठ (इ.७ वी, सखाराम मेहेत्रे विद्यालय, वाघ मळा )



