Breaking
ब्रेकिंग

भिंगार – नेहरू कॉलनी येथील रस्त्या बाबत अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन*

0 7 6 9 3 4

भिंगार – नेहरू कॉलनी येथील रस्त्या बाबत अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

भिंगार – सालाबादप्रमाणे मेहतर वाल्मिकी समाज्याच्या वतीने भिंगार नेहरू कॉलनी येथै भगवान श्री.जाहरवीर गोगादेव महाराज यांच्या जन्मोत्सव ( बागड ) शोभायात्रा मिरवणूकचे आयोजन करण्यात येते तसेच यंदाही दिं-१६/८/२५ शनिवार रोजी नेहरू कॉलनी गोगादेव मंदिर येथुन मिरवणूक काढण्यात येणार आहे‌ शोभायात्रा मध्ये गोगादेव महाराज यांच्या मूर्ती रथयात्रा तसेच भव्य दिव्य देखाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हि मिरवणूक भिंगार नेहरू कॉलनी येथून काढण्यात येते मिरवणुकीत अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असतात सध्या नेहरू कॉलनी या ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट झाले असून सदर रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे व मोठ्या प्रमाणात चिखल झालेले आहे या मुंळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तानां व तसेच रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूपच अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच रस्त्याचा दुरावस्था मुंळे भगवान गोगादेव जी महाराज यांच्या मिरवणूक काढण्यात त्रासदायक व अडथळा निर्माण होत आहे नेहरू कॉलनी येथील खराब झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून गोगादेव जन्मोत्सव शोभायात्रा मिरवणूक काढणे सोयची होईल.असे निवेदन अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या वतीने भिंगार येथील छावणी परीषद कार्यालयाचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे साहेब यांना देण्यात आले या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,सामाजिक कार्यकर्ते देविदास धुलिया,अमोल छजलाने,धरम छजलानै,अखिल भारतीय सफाई मजदूर जिल्हा अध्यक्ष शुभम टाक,सुधाकर गिलशेर,सुशांत सिरशे,अभिषेक भगवाने,गोविंद घोडके,धिरज बैद,लखन छजलाने आदी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे