सेना ध्वजदिन निधी संकलनात अहिल्यानगर राज्यात अव्वल
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार

सेना ध्वजदिन निधी संकलनात अहिल्यानगर राज्यात अव्वल
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावत आपली गौरवशाली परंपरा कायम ठेवली. यंदा ४ कोटी ७५ लाखांचा विक्रमी निधी संकलित करून जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थान मिळवले. याबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा शाल व वृक्ष देऊन सत्कार केला.
जिल्ह्याची ही विक्रमी कामगिरी विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरिकांच्या सहभागामुळे साध्य झाली असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
ध्वजदिन निधीचा उपयोग मुख्यत : देशासाठी हौतात्म्य स्वीकारलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या सहाय्यासाठी, दिव्यांग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी, आजी-माजी सैनिकांच्या कल्याण योजनांसाठी. सैनिकांच्या परिवारांसाठी विविध मदत उपक्रमांसाठी केला जातो.
या निधीमुळे अनेक वीर कुटुंबियांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होते. अहिल्यानगर जिल्हा नेहमीच राष्ट्रसेनेबद्दल कृतज्ञता जपणारा जिल्हा आहे, असे मत डॉ. उद्धव शिंदे यांनी व्यक्त केले.



