Breaking
ब्रेकिंग

आरोग्य मित्र जाणार १२ फेब्रुवारीपासून संपावर

0 3 9 0 4 0

आरोग्य मित्र जाणार १२ फेब्रुवारीपासून संपावर

प्रतिनिधी :- पंकज पाटील

महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्र प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे १२ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी मंगळवारी (दि. २१) दिली. सी.आय.टी.यू. संलग्न असलेल्या आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेने १८ जानेवारी रोजी महाराष्ट्रभर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचे पत्र काढले आहे. १२ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती कराड यांनी दिली. राज्य आरोग्य हमी सोसायटीला आणि सहाय्य संस्थांना कायदेशीर २१ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत जर आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न केल्यास आरोग्य मित्र महाराष्ट्रभर बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. या आधी २३ ऑगस्ट २०२४ रोजी आरोग्यमित्र संघटनेने एक दिवसीय कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी

महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र मुंबईत एक दिवसीय आंदोलनासाठी गेले होते. त्यावेळी राज्य आरोग्य सोसायटी आणि सहाय्य संस्था व आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत आरोग्य मित्राची पगार वाढ आणि इतर समस्यांची चर्चा झाली. सर्व चर्चा सकारात्मक झाली. राज्य आरोग्य सोसायटीने सांगितले की आचारसंहितेपूर्वी आरोग्य मित्रांच्या सर्व मागणी पूर्ण करू. तसेच बैठकीतील प्रमुख मुद्यांचे इतिवृत्त सुद्धा आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेला देण्यात आले होते. मात्र अद्यापही ठोस उपापयोजना केली नाही. २२ डिसेंबर २०२४ रोजी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे नाशिक येथील सिटी भवनात एक दिवसीय

अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या अधिवेशनामध्ये आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीला पुन्हा पत्र व्यवहार करून आरोग्य मित्रांच्या मागण्यासाठी बैठकीची मागणी केली. परंतु बैठकीसाठी कोणताही निरोप न आल्यामुळे शनिवारी (दि. १८) एम. आर. टी. यू आणि पी. यू. एल. पी. कायद्याच्या कलम २४ (१) मधील तरतूदीनुसार १२ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती कराड यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे