प्रतिपंंढरपूर ‘ताहाराबाद’ यात्रेतील गावच्या कन्येची सुबक रांगोळी प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू..!!
अश्विनी जाधव यांची सात ते आठ वर्षांपासूनची अविरत सेवा...

प्रतिपंंढरपूर ‘ताहाराबाद’ यात्रेतील गावच्या कन्येची सुबक रांगोळी प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू..!!
अश्विनी जाधव यांची सात ते आठ वर्षांपासूनची अविरत सेवा…
ताहाराबाद यात्रेतील गावच्या कन्येची रांगोळी भाविकांना भुरळ घालणारी ; शिक्षिका अश्विनी जाधव यांची सात ते आठ वर्षांपासून रांगोळी सेवा…!!
राहुरी तालुका जावेद शेख
आहिल्यानगर जिल्ह्यातील प्रतीपंढरपुर म्हणून ओळख असलेल्या श्री. क्षेत्र ताहाराबाद अर्थात थोर संत कवी महिपती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत महिपती महाराज यांच्या आशीर्वादाने दरवर्षी नवमी पासुन ते अमावस्या पर्यंत पांडुरंगाची फार मोठी यात्रा भरत असते. हजारो दिंड्या, लाखो भाविक या पुण्य-भुमीमध्ये हजेरी लावतात, साक्षात पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी पाच दिवस निवास करत असतात. पांडूरंगाचे नामस्मरण आणि हरिनामाच्या जयघोषाने ताहराबाद नागरी अक्षरशः दुमदुमून जाते.
प्रतिपंंढरपूर अशी ओळख असलेल्या संत कवी महिपती महाराजांच्या ताहाराबाद’ यात्रेत गावच्या कन्येची रांगोळी ठरली मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू पेशाने शिक्षिका असलेल्या आणि ताहाराबाद गावच्या कन्या असलेल्या अश्विनी झावरे जाधव यांची देवस्थान मधील मुख्य गाभाऱ्यातील रांगोळी सेवा गेल्या सात ते आठ वर्षांपासून निःशुल्क देत असतात याच अनुषंगाने ता.(२०) रोजी अश्विनी हिने काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली आहे. सध्या नोकरीच्या कारणास्तव पुण्याला स्थाईक असल्या तरीही दरवर्षी वेळात वेळ काढून यात्रा उत्सवाच्या प्रारंभी प्रतिपंंढरपूर ताहाराबाद येथे दाखल होऊन व्यक्तिचित्र रांगोळीची काढण्याची सेवा बजावली.
या यात्रेत दरवर्षी अनेक आकर्षण असतात परंतु या वर्षी मात्र मुख्यआकर्षण ठरले ते म्हणजे याच पुण्य भूमीत जन्मलेली तसेच लोणीकरांची सून,ताहाराबादकरांची कन्या सौ.अश्विनी जाधव झावरे यांनी महिपती महाराजांच्या सभामंडपामध्ये काढलेल्या रांगोळीमध्ये पंढरीच्या प्रथम विठुराया चे दर्शन होते तर भगवान विष्णूचा अवतार विठुरायाचे निस्सिम भक्त जगद्वंदनीय जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आणि संत कवी महिपती महाराज यांचे बोलके आणि हुबेहूब व्यक्तीचित्र स्वरूपाची सुरेख रांगोळी तब्बल सहा ते सात तासांचे अथक परिश्रम घेत पूर्ण केली. ही बोलकी रांगोळी दर्शनास येणाऱ्या भाविकांचे लक्षवेधून घेणारी आणि मोहात पडणारी ठरत आहे. म्हणून दर्शनासाठी येणारे अनेक भाविक रांगोळीचा फोटो आपल्या स्मार्टफोन मधील कॅमेरात टिपण्यास विसरत नाहीय.
खरंतर वेळात वेळ काढून ही माहेरवाशिन दरवर्षी आपली परंपरा सातत्याने जपताना पहायला मिळत असल्याने आश्विनीची ओळख ही रांगोळीवाली ताई अशी बनली अश्विनी ताईंनी काढलेल्या या रांगोळीने भाविकांच्या मनावर राज्य केल्याचे पहायला मिळत आहे.
अश्विनी जाधव यांनी आपल्या कलाकृतीमधून आकर्षक आणि सुबक रांगोळी रेखाटल्याबद्दल ताहाराबाद संस्थांचे अध्यक्ष राजेंद्रपाटील साबळे आणि मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे यांनी अश्विनी झावरे जाधव आणि पती राजेंद्र जाधव यांचा संस्थांनच्या वतीने सपत्नीक सन्मान करण्यात आला. तर संस्थानचे प्रमुख राजेंद्रपाटील साबळे आणि मठाधिपती महंत तनपुरे महाराज यांच्यासह उपस्थित भाविकांनी अश्विनीताई चे तोंडभरून कौतुक करत आभार मानले.
___________________________________________“मी दरवर्षी श्री.क्षेत्र ताहाराबाद अर्थात थोर संत कवी महिपती महाराज यांच्या यात्रेदरम्यान रांगोळी काढण्याकरिता येत असते. मी एक कलाशिक्षिका आहे परंतु या क्षेत्राची आवड असल्याने तसेच महिपती महाराज देवस्थान हे माझ्या माहेरचे असल्याने मला अभिमान आहे. त्या योगाने मला सेवा करण्याची संधी मिळते हे मी माझे परम भाग्यच समजते. ही रांगोळी सेवा मी येथून पुढे देखील करत राहणार आहे.”
– अश्विनी झावरे जाधव
(कलाश्री अकादमी, रंगोली कलाकार)



