Breaking
ब्रेकिंग

मा.सरपंच सुनील म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेसह १०० वृक्षांचे वृक्षारोपण

0 8 6 7 0 8

मा.सरपंच सुनील म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेसह १०० वृक्षांचे वृक्षारोपण

शाळा परिसरात वडासह विविध वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

अहिल्यानगर / प्रतिनिधी : शिवा म्हस्के

नगर तालुक्यातील दहिगाव येथे माजी सरपंच सुनील म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह गावातील विविध परिसरात १०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शाळेच्या कंपाउंडलगत तसेच परिसरात वडासह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.

या वृक्षारोपण उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास माजी सरपंच जयवंत शिंदे, महादेव पोटरे, आसाराम वाघ, सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय बनकर, निलेश पोटरे, बाळासाहेब शिंदे, प्रकाश वाघमोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश म्हस्के, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणासारखा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल माजी सरपंच सुनील म्हस्के यांच्या पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे