ब्रेकिंग
शिंपी समाज व शिंपी समाज पंचवडा संस्थेतर्फे श्री संत नामदेव महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

0
9
1
0
9
1
शिंपी समाज व शिंपी समाज पंचवडा संस्थेतर्फे श्री संत नामदेव महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २१/ श्री संत नामदेव महाराज जन्मोत्सवानिमित्त आज करमाळा येथे श्री संत नामदेव शिंपी समाज व शिंपी समाज पंचवडा संस्थेतर्फे श्री संत नामदेव जन्मोत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिंपी समाजाचे उपाध्यक्ष चंद्रकांत चुंबळकर यांच्या कडून राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सौ. वैशाली शाम वडे यांच्याकडून चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
अतिशय भक्तिमय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये श्रीसंत नामदेव महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी करमाळा शिंपी समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर सोहळ्याची माहिती पांडुरंग वसंत वडे (सचिव) यांनी दिली.
0
9
1
0
9
1



