Breaking
ब्रेकिंग

शिरूड नाका परिसराचा सर्वांगीण विकास

प्रताप शिंपींच्या प्रयत्नाने रस्ते ,गटारी, लायब्ररी सोबत खेळाचेही साहित्य उपलब्ध

0 3 9 0 7 2

शिरूड नाका परिसराचा सर्वांगीण विकास

प्रताप शिंपींच्या प्रयत्नाने रस्ते ,गटारी, लायब्ररी सोबत खेळाचेही साहित्य उपलब्ध

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर- शहरातील शिरूड नाका परिसरातील नागरिकांचा तरुणांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रताप शिंपी प्रयत्न करीत आहेत. रस्ते, गटारी ,सभागृह , लायब्ररीसह आता कुस्तीगीर तरुण आणि पैलवान यांना आंतराष्ट्रीय (इंटरनॅशनल) स्तरावरील कुस्तीच्या स्पर्धेत खेळण्या करिता सरावासाठी अत्याधुनिक मॅट उपलब्ध करण्यात आली आहे. प्रताप शिंपी यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन देऊन तातडीने कुस्ती मॅट मंजूर करण्याची मागणी केली होती. अमळनेर शहरातील सर्व पैलवान व कुस्तीगीर मंडळींसाठी नगरपालिकेच्या मार्फत मॅट उपलब्ध करण्याची मागणी झाली होती,अखेर पालिकेने याची दखल घेत सदर कुस्ती मॅट उपलब्ध करून दिल्याने कुस्तीगीरांची मोठी सोय झाली असून छत्रपती शिवाजीनगर येथे हॉल मध्ये ही मॅट सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे.सदर पाठपुराव्याबद्दल प्रताप शिंपी यांचे तर उपलब्धतेबद्दल पालिकेचे आभार कुस्तीगीरांनी व्यक्त केले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे