Breaking
ब्रेकिंग

जनता विद्यालयाचे विद्यार्थी सर्व गुणसंपन्न – मुकेश मुळे

0 7 6 9 3 4

जनता विद्यालयाचे विद्यार्थी सर्व गुणसंपन्न – मुकेश मुळे

वाळकी /  प्रतिनिधी (दादासाहेब आगळे)

दि. 29 – जनता विद्यालय रुईछत्तीशी, ता. नगर या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे सहसचिव श्री मुकेशदादा मुळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर प्रयत्नशील राहिल्यास गुणवत्तापूर्ण होऊ शकतो व गुणवत्ता यादी स्थान मिळून स्वतःला सिद्ध करू शकतो हे जनता विद्यालयातील गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर सिद्ध होते. म्हणून यापुढील काळात अजून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी इंटरऍक्टिव्ह बोर्ड च्या माध्यमातून शिक्षण मिळण्यासाठी सदरचे बोर्ड उपलब्ध करून देणार असल्याचे श्री मुकेश दादा मुळे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे कार्यकारणी सदस्य,ॲड. माणिकराव मोरे, सौ अलकाताई मुळे, ग्रामस्थ बिभीषण सपाटे, बाळासाहेब दरंदले, प्राचार्य श्री दत्ता पाटील नारळे,पर्यवेक्षिका सौ. टी.बी. पाडळकर आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातील आठवी शिष्यवृत्ती पात्र दहा विद्यार्थी,एन. एम. एम. एस. परीक्षेतील तीन शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी, ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेतील सहा शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत निवड झालेल्या चार खेळाडूंचाही सन्मान यावेळी करण्यात आला. चित्रकला ग्रेड परीक्षेतील ‘A’ ग्रेड प्राप्त सात विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. अभिनय क्षेत्रामध्ये प्रारण चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या कलेचा ठसा उमटविणारी जनता विद्यालयाची बालकलाकार कु. अनुजा दत्तात्रय शिंदे हिचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे