राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमेच्या दिवशी 42 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई
वाहन विक्री करणाऱ्या दुकानदारांनी विना नंबर प्लेट गाडी ग्राहकांना दिल्याने त्यांच्यावरही कारवाई
राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमेच्या दिवशी 42 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई
वाहन विक्री करणाऱ्या दुकानदारांनी विना नंबर प्लेट गाडी ग्राहकांना दिल्याने त्यांच्यावरही कारवाई
राहुरी / वृत्तसेवा : जावेद शेख
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन ने आज दिनांक 26.12. 2024 रोजी विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती.
सदर मोहिमेदरम्यान 42 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली. सदर वाहनांवर18500रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच 42 पैकी एक वाहन हे व्हेईकल डीलर यांनी आरटीओ नोंदणी होण्यापूर्वीच विना नंबर प्लेट ग्राहकास दिल्याने त्याबाबत चौकशी करून पुढील कारवाई करत आहोत.
आजच्या कारवाईतील 42 वाहनांवर दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसवून वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे .
राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोध ही सोपा होईल.
सदर चोरीचे वाहन शोध मोहीम ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फडोळ , पोलीस उपनिरीक्षक पाटील , पोलीस हवालदार ठोंबरे, ठाणगे पो कॉ ,जालिंदर धायगुडे, यांच्या पथकाने केलेली आहे.
नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यात आला आहे तसेच सदरील वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूम वाल्यांना आरटीओ द्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल