Breaking
ब्रेकिंग

न्यु लॉ कॉलेज येथे रक्तदान शिबिर संपन्न

तरुणांनी रक्तदान करावे - प्रा .पांढरे सर

0 7 6 9 4 3

न्यु लॉ कॉलेज येथे रक्तदान शिबिर संपन्न 

तरुणांनी रक्तदान करावे – प्रा .पांढरे सर

नगर / प्रतिनिधी : आसावरी वायकर

अहिल्यानगर येथील न्यु लॉ कॉलेज येथे शनिवार दि . १४ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन प्राचार्य एम .एम .तांबे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले . शिबिरासाठी नगरचे जिल्हा रुग्णालयाचे सहकार्य लाभले . डॉ .आरती वारे यांच्या मार्गदर्शनाने रक्त संकलन करण्यात आले . यावेळी एकूण १७ रक्तदात्यांनी रक्तदान केले . उपस्थित मान्यवरांचा कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला .

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांत रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यासाठी रक्तदान शिबिरे अत्यंत गरजेची आहेत .

यावेळी प्रा. बी .डी .पांढरे सर म्हणाले, रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात जवळपास १७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी हिरालाल होटकर दिपक पवार , माया कोल्हे गर्जे सर , झांबरे सर, पोकळे सर, अभिजीत खरात, विशाल चावरे तसेच कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे