Breaking
ब्रेकिंग

दहिवद व लोंढवे शेतशिवारातून शेती साहित्याची चोरी

0 3 9 0 2 0

दहिवद व लोंढवे शेतशिवारातून शेती साहित्याची चोरी

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : तालुक्यातील दहिवद व लोंढवे परिसरातील शेतांमधून अज्ञात चोरट्यानी शेती साहित्य चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
?दहिवद येथील शेतकरी भूषण मंगा माळी हे २ रोजी सकाळी शेतात जाऊन पाण्याची मोटार चालू केली असता मोटर चालू झाली नाही. विहिरीत डोकावून पाहिले असता तीन फेज ची ८० फूट केबल चोरीस गेली होती. तसेच पत्री शेड मध्ये ठेवलेले फवारणी चार्जिंग मशीन ,८ प्लास्टिक पाईप , २ तराजू काटा आदी साहित्य पण चोरीस गेल्याचे दिसून आले. तसेच अनिल भूकन माळी यांच्या शेतातून १०० फूट केबल चोरी गेली. एकनाथ त्र्यंबक सोनार यांच्या शेतातून ७५ फूट केबल वायर , मधुकर पोपट पाटील यांच्या शेतातून ८० फूट केबल , हिंमत वसंत महाजन यांच्या शेतातुन ९० फूट केबल चोरीस गेली. आजू बाजूच्या शेतातून ११ हजार ४५० रुपयांचे साहित्य चोरीस गेले. भूषण मंगा माळी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.
? लोंढवे त्याच प्रमाणे तालुक्यातील लोंढवे येथील लोटन पाटील यांच्या शेतातून ६० हजार रुपये किमतीच्या सोलर पंप च्या तीन प्लेट चोरीस गेल्याची घटना घडली. पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे