Breaking
ब्रेकिंग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मढेवडगाव विद्यालयाच्या वतीने अभिवादन…

0 3 9 0 2 7

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मढेवडगाव विद्यालयाच्या वतीने अभिवादन

श्रीगोंदा /  प्रतिनिधी – आदेश उबाळे

श्रीगोंदा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात महापरिनिर्वाण विद्यालयाच्या वतीनं अभिवादन करून साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष भोईटे, प्रमुख वक्ते शंकर यदलोड व विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साईराज आवारे, अनुष्का उबाळे, समृद्धी सोमवंशी, स्वरा उंडे, श्रेया जगताप, वैष्णवी ठोकळे, समृद्धी मांडे, या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शंकर यदलोड यांनी संविधानाची सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष भोईटे म्हणाले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे कोणी प्राशन करेल तो गुरगुर ल्या शिवाय राहणार नाही . या कार्यक्रमाप्रसंगी रामदास पवार, राजेंद्र शेळके, अरुण पवार,वैभव काळोखे, प्रणव नलगे, संतोष भोईटे, विठ्ठल लेंडे, अंकुश कोकाटे, भगवान दिघे, मीनाक्षी कदम, लक्ष्मी बोलणे,अर्चना कोरडे, सुमती सुरसे, महादेवी माने, रोशनी भवर, स्नेहल धुमाळ, नितीन शिरोळे, इत्यादी सेवक बंधू भगिनी कार्यक्रमास उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवी अ च्या वर्गाने केले. तर आभार सुकन्या साळवे हिने मानले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे