Breaking
ब्रेकिंग

प्रशिक्षण शिबिरातील विचार बूथ स्तरापर्यत कार्यकर्त्यांनी पोहचवा – ना. विखे

0 7 9 8 0 4

प्रशिक्षण शिबिरातील विचार बूथ स्तरापर्यत कार्यकर्त्यांनी पोहचवा – ना. विखे

भाजपा कार्यकर्त्यासाठी अंत्योदयाचा मंत्र हा आत्मा तर प्रशिक्षण पुस्तिका ही गीता – ना. विखे

शिर्डी येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न

राहुरी तालुका जावेद शेख

भाजपा कार्यकर्त्यासाठी अंत्योदयाचा मंत्र हा आत्मा तर प्रशिक्षण पुस्तिका ही गीता असून प्रशिक्षण शिबिरातील विचार बूथ स्तरापर्यत व शेवटच्या कार्यकर्त्यां पर्यंत पोहचवले तर प्रशिक्षणचा उद्देश सफल होईल अशी भावना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
शिर्डी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 च्या समारोप प्रसंगी ना. विखे पाटील बोलत होते. यावेळी आ. मोनिका राजळे, आ. अक्षय कर्डिले, माजी आ.स्नेहलता कोल्हे, प्रदेश कार्यालयीन प्रभारी रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अनिल मोहिते, राजेंद्र गोंदकर उपस्थित होते.
ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, या प्रशिक्षण शिबिराला वैचारिक अधिष्ठान होते. पक्षाचा विचार घेऊनच समाजातील सर्व क्षेत्रांत कार्यकर्ता म्हणून काम करताना पक्ष संघटना हेच आपल्या सर्वासाठी बळ आहे. देशाच्या विकास प्रक्रियेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंत्योदयाच्या मंत्राची जोड दिली.
प्रशिक्षण शिबिरामुळे आपल्या कार्याला गती मिळणार असून, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा आणि एकात्म मानवतेचा मंत्र आपल्या सर्वासाठी आत्मा आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला विकास प्रक्रियेत सामावून घ्यायचे आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास होईल तेव्हाच देशाचा विकास होईल, हे उद्दिष्ट समोर ठेवून प्रत्येकाची वाटचाल असली पाहिजे.राजकीय व सामाजिक कार्यात आपली वैचारिक भूमिका स्पष्ट असली पाहिजे. ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना आपल्या कृतीत असावी. पक्षाचे संस्कार हाच आपल्या कामाचा पाया असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या सुरू असलेल्या प्रत्येक कामाला विचारांची जोड आहे. म्हणूनच जगात देशाचे स्थान बळकट झाले असल्याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
भारतीय जनता पक्षाचा एक प्रशिक्षित कार्यकर्ता म्हणून समाजातील सर्व क्षेत्रांत आपल्याला काम करायचे आहे. लोकांना पक्षाशी जोडायचे आहे. भाजप हा एक परिवार आहे ही भूमिका घेऊन कार्यकर्त्याना आपली कर्तव्ये बजावावी लागतील. चांगला संवाद, चांगले वर्तन आणि संघटना हे आपले बळ मानून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्याना केले.
या प्रशिक्षण वर्गाचे स्वागत व प्रास्तविक जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी केले. सूत्रसंचालन सोशल मिडिया जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी व वर्ग प्रशिक्षण गीत सचिन भैरव व राजेश्वर श्रीराम यांनी सादर केले. वर्ग यशस्वी करण्यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, कांचंनताई मांढरे, अशोक पवार, उपाध्यक्ष किरण बोरुडे, शिर्डी मंडल अध्यक्ष रविंद्र गोंदकर, योगेश गोंदकर, आनंद बुधेकर,अशोक भुसाळ यांनी विशेष प्रयत्न केले.
*कोट:-*
*प्रशिक्षण वर्गात यांनी केले मार्गदर्शन*
महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी व्यावहारिक, आमदार विक्रम पाचपुते यांनी एकात्मता मानवतावाद, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी स्थानिक कार्यक्रम व बूथ प्रबंधन व मन की बात, माजी आमदार सुनील राणे यांनी कार्यकर्ता विकास, माजी आमदार राम सातपुते व प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी भाजपा कार्यविस्तार, प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी सोशल मिडिया व आय टी सेल, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी भाजपा चा इतिहास व विकास, प्रदेश सचिव भैरवी वाघ यांनी विचार परिवार, माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी भाजपा कार्यपद्धती तर लातूर महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रेरणा होनराव यांनी गरीब कल्याण योजना व नारी शक्ती वंदना या विषयावर मार्गदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे