Breaking
ब्रेकिंग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी.

0 7 6 9 4 1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी.

राहुरी तालुका जावेद शेख

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल जयंतीनिमित्त जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून जिल्हाभरात मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, सभा व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व जयंतीला गालबोट लागू नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त व SRPF तैनात करावी
संवेदनशील ठिकाणी CCTV व नियंत्रण कक्ष सुरू करावेत
सोशल मीडियावरील अफवा व द्वेषप्रचारावर कठोर कारवाई करावी
मिरवणुकीसाठी वाहतूक, सुरक्षा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात
सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून शांतता समिती बैठका घ्याव्यात
आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी
पुतळे व स्मारकांची सुरक्षा व स्वच्छता सुनिश्चित करावी
या निवेदनाद्वारे जयंती हा केवळ उत्सव नसून संविधानिक मूल्यांचा गौरवदिन असल्याचे सांगत, जिल्ह्यात शांतता, बंधुभाव व सुरक्षिततेचे वातावरण राखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी रिपाइं जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात अँड. कुमार भिंगारे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे