Breaking
ब्रेकिंग

गोरक्षनाथ गडावर १४ नोव्हेंबरला प्रकटदिन उत्सव

0 3 9 0 6 1

गोरक्षनाथ गडावर १४ नोव्हेंबरला प्रकटदिन उत्सव

प्रतिनिधी : पौर्णिमा कोमाकूल

अहिल्यानगर :  धार्मिक महत्व असलेल्या नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर १४ नोव्हेंबरला गोरक्षनाथ प्रकटदिन उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष ऍड शंकरराव कदम यांनी दिली
सकाळी ८ ते १० महापूजा व अभिषेक मान्यवर भाविक भक्तांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर सकाळी १० वा भागवताचार्य गोरक्षनाथ महाराज देठे,शास्त्री, लोणीकर यांचे कीर्तन होणार आहे तर दुपारी १२ ते ३ यावेळेत रामदास पठारे,दत्तात्रय भुतकर व नाथ भक्ताच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आहे.

कार्यक्रमाचे संयोजन ईश्वर महाराज कदम शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली व उंबरे भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होत आहे उत्सवा निमित्त पहाटेपासून दिवसभर मोठ्या संख्नेने भाविक दर्शनासाठी येतात व दिवशभर दर्शनासाठी रांग लागलेली असते
गोरक्षनाथ ११ व्या ते १२ व्या शतका दरम्यान झालेले नाथ योगी होते. गोरक्षनाथांचे नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम आहे. गोरख जिल्ह्यात एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पद चिन्ह आहे. त्याची जन्मकथा अशी आहे मच्छिंद्रनाथ भारतभर भ्रमण करीत असे फिरत असता एका घरी भिक्षा मागण्यास गेले. त्या स्त्रीस संतती नव्हती. दारी आलेल्या तेज:पूंज साधूला भिक्षा वाढताना पुत्रप्राप्तीची कामना व्यक्त केली. मच्छिंद्रनाथांने त्या स्त्रीला चिमूटभर भस्म दिले व आशिर्वाद दिला. मुलगा होईल. सदर स्त्रीने आपल्या शेजारणीला झालेली हकीकत सांगितली पण त्या हसू लागल्याने त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले. बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले व मुलाची चौकशी केली तेव्हा मूल झालेच नाही असे त्या स्त्रीने सांगितले. सर्व हकिकत स्त्रीकडून ऐकून मच्छिंद्रनाथ शेणाच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन चलो गोरक्ष म्हणून हाक मारली.त्या शेणातून मुलगा प्रगटला व म्हणाला ‘आदेश’ मग मच्छिंद्रनाथ त्याला घेऊन गेले.

येथील स्मृतीमंदिराचे काम पूर्ण झाले आहे, कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त मंडळ,मांजरसुंभा ग्रामस्थ यांनी केले आहे

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे