Breaking
ब्रेकिंग

लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर गुंडेगाव येथे जनावरांचे लसीकरण…

0 8 6 6 5 7

लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर गुंडेगाव येथे जनावरांचे लसीकरण…

वाळकी /  प्रतिनिधी: दादासाहेब आगळे

-अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथे लंपी रोगाचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लम्पी लसीकरण सुरू आहे.गावात सध्या लम्पी लागण झालेल्या जनवांची संख्या कमी असली तरी लम्पी साथ आटोक्यात आणण्यासाठी गुंडेगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. गुंडेगाव येथे लम्पी आजाराने शिरकाव केला असून मागील दहा दिवसांपासून जनावरांना लसीकरण सुरू आहे.लम्पी आजाराने डोके वर काढले आहे. मागील दहा दिवसांत गुंडेगाव येथील विविध भागांतील ८० ते ९० टक्के जनावरांना लम्पी लसीकरण झाले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये या पार्श्वभूमीवर लसीकरण सुरू करण्यात येत आहे तसेच पाळीव जनावरांना लम्पी रोगाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे.
लम्पी आजार हा ‘कॅप्रीपॉक्स’ विषाणूमुळे होतो.त्यामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप येतो. डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येतो. चारा खाणे कमी अथवा बंद होते. दूध उत्पादन कमी होते. काही जनावरांत पायावर सूज येणे आणि लंगडणे, असे प्रकार घडतात. डास, चावणाऱ्या माश्या, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यामुळे हा आजार फैलावतो.त्यामुळे पशुपालकांनी चारा कमी खाणाऱ्या जनावरांची तपासणी करून घ्यावी. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करावी, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा जगदाळे यांनी केले आहे. तसेच मदतीसाठी परिचर शेळके आणि पशुसखी प्राजक्ता जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

लम्पी स्कीन हा आजार पुन्हा बळावत आहे याचे कारण म्हणजे जनावरांची कमी होत चाललेली रोगप्रतिकारशक्ती या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गेली दहा दिवसांपासून लसीकरण सुरू करण्यात येत आहे.खाजगी पशुवैद्यकीय कर्मचारी यांच्या सहाय्याने लसीकरण करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. – –

डॉ स्नेहा जगदाळे
(पशुधन विकास अधिकारी गट अ )

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे