Breaking
ब्रेकिंग

डाळिंब पिकावरील तेलकट डाग व मर रोगाचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्नात भरीव वाढ होईल* *- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के*

0 8 6 5 0 8

*डाळिंब पिकावरील तेलकट डाग व मर रोगाचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्नात भरीव वाढ होईल*
*- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के*

राहुरी तालुका जावेद शेख

कोरडवाहू फळपिकात डाळिंब हे महत्त्वाचे पीक आहे. डाळिंब पिकाने मोठी क्रांती करून डाळिंब उत्पादक शेतकर्यांच्या जीवनात उर्जितावस्था आणली. कृषी विद्यापीठात मर व तेल्या रोगावर बहुमूल्य असे संशोधन झाले आहे. शेतकरी बांधवांनी फळपिकांमध्ये सुरुवातीपासूनच खबरदारी घेणे महत्त्वाचे असते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून डाळिंब पिकावरील तेलकट डाग व मर या रोगांचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्नात भरीव वाढ होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या इंडो इस्राईल कृषि प्रकल्प, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे, डाळिंब गुणवत्ता केंद्र व अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत डाळिंब उत्पादक शेतकर्यांसाठी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. डाळिंब लागवड व प्रक्रिया या विषयावर आयोजित या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. यावेळी उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुभाष गायकवाड व प्रगतशील शेतकरी शामराव लोंढे उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. वासुदेव लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. बी.टी. पाटील, डॉ. सुभाष गायकवाड, डॉ. अजय हजारे, डॉ. सुवर्णा देवरे, डॉ. प्रकाश मोरे व दत्तात्रय गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तीन दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणात गुटी कलम, छाटणी प्रात्यक्षिक, सूत्र कृमी व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन, डाळिंब लागवड व प्रक्रियेशी संबंधीत विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश मोरे यांनी तर आभार डॉ. अजय हजारे यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी कानडगाव, तांभेरे व पाथर्डी तालुक्यातील कौडगाव येथील 25 डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्पातील कर्मचारी दत्तात्रय गायकवाड, शंकर गायके व अण्णासाहेब जाधव यांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे