Breaking
ब्रेकिंग

संघर्षा नंतर लोहार समाजाचे आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित ;  लोहार समाजाच्या तरुणांच्या संघर्षाला अखेर यश

लोहार समाजाला मिळालेले आर्थिक विकास महामंडळ आर्थिक महामंडळ अखेर कार्यान्वित

0 7 6 9 3 2

संघर्षा नंतर लोहार समाजाचे आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित ;  लोहार समाजाच्या तरुणांच्या संघर्षाला अखेर यश

लोहार समाजाला मिळालेले आर्थिक विकास महामंडळ आर्थिक महामंडळ अखेर कार्यान्वित

विशेष प्रतिनिधी :  शिवहरी म्हस्के

पूर्वीचे उपमुख्यमंत्री व आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सागर निवासस्थानी दिनांक २७ /९/ २०२४ रोजी मायक्रो ओबीसी बैठकीमध्ये समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते .हे निवेदन ओबीसी आयोगाचे अध्यक्ष नामदार हंसराज अहिर साहेब, यांना देण्यात आले होते. सदर निवेदनावर विचार करून सरकारने १०/१०/२०२४ झालेल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत महामंडळ मंजूर केले. शासन निर्णय१५/१०/२०२४ काढला शासन निर्णय काढून अद्याप महामंडळ एका महिन्यात कार्यान्वित झाले नाही. पुन्हा एकदा ५/१२/२०२४ रोजी मुख्यमंत्री सचिवालय यांना निवेदन देण्यात आले . तदनंतर दिनांक ६/१२/२०२४रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब, यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे भेट घेऊन दादांनाही निवेदन दिले. त्यानंतर दिनांक३०/०६/२०२५ रोजी मुंबईमध्ये मंत्रालय मध्ये जाऊन मुख्यमंत्री सचिवालय यांच्या कार्यालयात मागील पाच महिन्यापूर्वी दिलेले निवेदने त्याच्यावर काय कारवाई झाली असे विचारण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाकडून आपले निवेदन हे इतर मागास विभागVJNT या ठिकाणी क्रमांक ७८ २३ १४९ या नंबरने पाठवण्यात आलेले आहे. आपण या विभागाशी संपर्क करावा असे सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही पत्रकार शिवाजी दवणे, पत्रकार गणेश भालके , सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ कौसे,आज या विभागात गेल्यानंतर त्यांना दिलेला निवेदनाची पोच दाखवल्यानंतर त्यांच्याकडून सांगण्यात आले ,की आपल्या समाजाला झालेले ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरी जी महाराज जी आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झालेले आहे .असे पत्र आम्हाला शासनाने दिले त्यामुळे संपूर्ण लोहार समाजाला आनंदाची बातमी देत आहोत. व या महामंडळाचा संपूर्ण श्रेय समाजाला समर्पित करीत आहोत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्हाला हे महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी श्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे पत्र,आमदार श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे पत्र ,आमदार श्री संग्राम भैय्या जगताप साहेब यांचे पत्र,आमदार श्री अमोल भाऊ खताळ यांचे पत्र ,खासदार श्री निलेशजी लंके साहेब यांचे पत्र, श्री खासदार भाऊ साहेब वाकचौरे साहेब चे पत्र ,श्री आमदार हेमंजी ओगले साहेब यांचे पत्र,श्री आमदार सत्यजित दादा तांबे यांचे पत्र,श्री माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांचे पत्र, तसेच श्री अंबादास दानवे साहेब यांचे पत्र, या सर्व मंत्री आमदार खासदार महोदय यांचे पत्र समाजाचे महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी कामी आले .तसेच आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करणारे श्री प्रभाकर जी लाड सर व श्री रामलिंग जी कांबळे साहेब शासनाची सतत पत्र व्यवहार करणारे वेळोवेळी आम्हाला घेऊन मुंबईला जाणारे व या ठिकाणी प्रत्येक मंत्र्यांची भेटी घेणारे मंत्री महोदयांना निवेदन देणारे श्री गणेश रामदास भालके ,त्याचप्रमाणे शासनाची झालेला पत्रव्यवहार व मंत्र्यांच्या भेटीगाठी व्हाट्सअप द्वारे सोशल मीडिया द्वारे समाजामध्ये प्रसार प्रचार करणारे श्री पत्रकार शिवाजी दवणे व सतत मंत्रालयामध्ये या गोष्टीचा फॉलोअप घेणारे मंत्रालयात केलेल्या पत्रव्यवहार याची सतत माहिती मिळवणारे श्री दत्ताभाऊ कौसे सर्वांच्या अथक प्रयत्नाने समाजाचं महामंडळ कार्यान्वित झालं
या अनुषंगाने आज समाजासाठी झटत असलेल्या लोहार समाजातील ज्येष्ठ व्यक्ती ज्यांनी मोलाचे सहकार्य केले, असे प्रभाकर जी लाड सर, सर्वांचे मार्गदर्शक बोल महाराष्ट्र न्यूज चे सहज संपादक रामलिंगजी कांबळे साहेब, तसेच समाजाच्या हितासाठी नेहमी अग्रेसर असणारी दत्ताभाऊ कसे, तसेच अगदी तळमळीने काम करणारे समाजसेवक तसेच पत्रकार गणेश भाऊ भालके, व सर्वांना बातमीद्वारे किंवा इतर संदेशाद्वारे लोहार समाजासाठी व समाजाच्या भल्यासाठी काम करणारी पत्रकार क्राईम महाराष्ट्र न्यूज चे सहसंपादक शिवाजी दवणे यांची मोलाचे सहकार्य लाभले .

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे