अल्पवयीन मुलीस आमिष दाखवुन पळुन नेऊन तिच्यावर केला अत्याचार
आरोपीस राहुरी पोलिसांनी घेतले ताब्यात
अल्पवयीन मुलीस आमिष दाखवुन पळुन नेऊन तिच्यावर केला अत्याचार
आरोपीस राहुरी पोलिसांनी घेतले ताब्यात
आरोपीस दोन दिवस पोलीस कस्टडी
राहुरी तालुका / प्रतिनिधी : जावेद शेख
दि.05/06/2025 रोजी सकाळी 10/45 वाजता फिर्यादी यांची मुलगी नवीन घराचे काम पाहून येते असे म्हणून घरातून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) वाढीव कलम 87,64(1), सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा कलम 4,8,12 प्रमाणे तक्रार दाखल केल्याने दाखल गुन्हाचे कुठलेही प्रकारचा मागमूस नसताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की इसम नामे प्रमोद उर्फ सनी शंकर साळवे , वय 21 वर्ष रां कनगर, तालुका राहुरी यांनी सदर अल्पवयीन मुलीस शिर्डी येथे अपहरण करून नेले आहे व तेथून राहुरी मार्गे अहिल्यानगर येथे मजुरी साठी घेवून जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने वरील गुन्ह्याचे तपासी अधिकारी व पोलीस पथक येथे रवाना होऊन आरोपीस राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक 16/07/2025 रोजी दुपारी नगर मनमाड रोड राहुरी येथे 14/00 वा. मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका करुन तीस पालकांच्या ताब्यात देऊन आरोपीस पुढील कारवाई करीता अटक करण्यात आली आहे.
अटकेनंतर आरोपीस आज मान्य न्यायालयापुढे हजर करून त्याच्या पोलीस कस्टडी रिमांड ची मागणी करून दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे.
सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे,पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाकचौरे अपर पोलिस अधीक्षक अहिल्यानगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोसई गणेश वाघमारे, पोहेकों शेळके, पोना/ प्रविण बागुल, पोकॉ/इफतेखार सय्यद तसेच मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोसई गणेश वाघमारे हे करीत आहेत .
*सन 2024 ते आजपावेतो राहुरी पोलीस स्टेशन ने 71 अपहरण झालेल्या मुलींचा शोध लावलेला आहे
सदर गुन्ह्याबाबत तसेच इतर काही माहीती दयावयाची असल्यास श्री. पोनि, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन संपर्क – 8788891147 वर माहिती द्यावी .



