Breaking
ब्रेकिंग

ॲड. सविता शिंदे यांच्याकडून त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून कोटलिंग पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज, चिखलठाण येथे सॅनिटरी पॅड मशीन भेट

0 8 9 6 7 5

ॲड. सविता शिंदे यांच्याकडून त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून कोटलिंग पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज, चिखलठाण येथे सॅनिटरी पॅड मशीन भेट

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २८/ मुलींच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी एक स्तुत्य उपक्रम म्हणून ॲड. सविता शिंदे यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून कोटलिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, चिखलठाण येथे सॅनिटरी पॅड डिस्पेंसर मशीन भेट म्हणून दिली. शाळेतील इयत्ता 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात शाळेत कोणतीही अडचण येऊ नये, त्यांची शाळा बुडू नये या सामाजिक बांधिलकीतून ॲड. सविता शिंदे यांनी हा उपक्रम राबविला. समाजोपयोगी वस्तू भेट देण्याचा त्यांचा हा विचार सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

या मशीनमुळे विद्यार्थिनींना आता अवघ्या एका बटणावर सॅनिटरी पॅड उपलब्ध होणार आहे. शाळा प्रशासनाने यासाठी मुलींच्या स्वच्छतागृहात स्वतंत्र व्यवस्था केली असून वापरलेले पॅड नष्ट करण्यासाठी Incinerator मशीनचीही सोय केली आहे.

यावेळी संस्थेच्या सचिव सौ. विद्या बारकुंड मॅडम म्हणाल्या, “ॲड. सविता शिंदे यांनी आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिलेली ही भेट खरोखरच प्रेरणादायी आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींमधील संकोच दूर होऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल.”

याप्रसंगी शाळेतील महिला शिक्षकवृंद, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शाळेच्या वतीने ॲड. सविता शिंदे व त्यांच्या मातोश्रींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आभार मानण्यात आले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे