स्मॉल वंडर्स प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. . .
स्मॉल वंडर्स प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. . .
राहुरी वृत्तसेवा / जावेद शेख
राहुरी तालुक्यातील वांबोरी फाटा येथील पद्मावती फाउंडेशनचे स्मॉल वंडर्स प्रायमरी स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन त्यांच्या स्कूलच्या मैदानात अतिशय उत्साहात पार पडले. त्यामध्ये विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषक आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
त्यानंतर सायंकाळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख आणि कौतुकास्पद सांस्कृतिक कार्यक्रम देखील साजरा केला. त्यांच्या या कलेने पालक वर्ग भारावून गेला होता.
यावेळी उपस्थित पालक यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी अत्यंत दिशादर्शक आणि मोलाचे मार्गदर्शन देखील केले. आणि आवर्जून सांगितले की,आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी पालकांचे योगदान देखील शिक्षकांबरोबरच तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर दररोज समन्वय साधला पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे असे मनोगत त्यांनी सांगितले…
या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवोदय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बंडू गायकवाड, तसेच प्रबोधन एज्युकेशन फाउंडेशन चे संस्थापक संतोष माने, आणि खडांबे गावचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जठार, आणि ब्राह्मणी येथील आदर्श विद्यालयचे माजी प्राचार्य अरुणराव पवार, हे उपस्थित होते. तसेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले…..
या वार्षिक स्नेहसंमेलन नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी स्कूलचे सर्वच शिक्षक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याचे प्रिन्सिपल समीर अरुणराव पवार यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी शाळेसाठी स्कूल ला 43 इंची टी व्ही भेट दिला त्याचे स्कूल त्यांचे समीर सरांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुसळकर मॅडम व सोनवणे सर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांच्या आभार खडसे मॅडम यांनी मानले.