Breaking
ब्रेकिंग

न्यू आर्ट्स महाविद्यालयात ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

0 3 9 0 7 2

न्यू आर्ट्स महाविद्यालयात ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

विशेष प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

शेवगाव येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात वाणिज्य विभाग व सी.ए. अहमदनगर शाखा तसेच रोटरी क्लब शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास आय.सी.ए.आर. चे चेअरमन माननीय श्री सी. ए. सनीत मुथा व ऋषिकेश वाघ मार्गदशक म्हणून लाभले.

भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकी संबंधी तसेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी संबंधित धोके टॅक्स याविषयी माहिती सांगून आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे याचे महत्त्व सनीत मुथा यांनी पटवून दिले. व्यावसायिक शिक्षण गुंतवणूक ही भविष्याची गरज आहे आणि विद्यार्थ्यांनी यात आपली प्रगती करणे काळाची गरज आहे असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य पुरुषोत्तम कुंदे यांनी मांडले.

रोटरी क्लबचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. संजय लड्डा व सोबत कासोळे सर व काटे सर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सदर कार्यक्रमाचे संयोजन प्रा. मंगेश यांनी केले. प्रा. उद्धव देवढे व प्रा. गणेश पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रा. शितल देशमुख यांनी मानले व या कार्यक्रमासाठी प्रा. मोहन वेताळ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

5/5 - (4 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे