खोखो स्पर्धेत नवनागापूरच्या साई इंग्लिश मीडियम स्कूलला सिल्व्हर मेडल
मैदानी खेळांना प्रोत्साहित करा - - सिताराम ढोरजकर
खोखो स्पर्धेत नवनागापूरच्या साई इंग्लिश मीडियम स्कूलला सिल्व्हर मेडल
मैदानी खेळांना प्रोत्साहित करा – अध्यक्ष :सिताराम ढोरजकर
एस डब्ल्यू न्यूज / प्रतिनिधी : महेश चव्हाण
अहिल्यानगर शहराच्या उपनगर भिंगार येथे आज दि . 8 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेल्या लोकमत महा गेम्स 2025 क्रिडा स्पर्धा येथे खो खो स्पर्धेत नवनागापूर येथील अल्पावधीत लोकप्रिय झालेले साई इंग्लिश मीडियम स्कूल नवनागापूर या शाळेने 13 वर्षा खालील वयोगटामध्ये खो-खो स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करत सिल्वर मेडल मिळवून नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे .
लोकमत महा गेम्स 2025 क्रिडा स्पर्धेत या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक दिग्गज विविध संघ सहभागी होते. याप्रसंगी उपनगरातील अनेक क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसह जिल्ह्यातील अनेक क्रिडा रसिकांनी हजेरी लावली . सर्वांचा उत्साह पाहण्या सारखा होता .
शाळेच्या खो खो संघाच्या विद्यार्थ्यांना साई इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका वैष्णवी ढोरजकर, वैष्णवी मॅडम, अर्जुन सर, आवेज सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी खो खो स्पर्धेत केलेल्या रोमहर्षक कामगिरी बद्दल साई इंग्लिश मीडियम स्कूल संस्थेचे अध्यक्ष मा . श्री . सिताराम ढोरजकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या व मैदानी खेळांना प्रोत्साहित करण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम भविष्यात राबवू याची ग्वाही याप्रसंगी दिली .
या यशाने मात्र अनेक सामाजिक राजकिय क्षेत्रातून शाळा व विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे .