शालेयस्तरीय क्रिकेट स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय करमाळा चे घवघवीत यश

शालेयस्तरीय क्रिकेट स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय करमाळा चे घवघवीत यश
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ११/ महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय १४ वर्ष वयोगट क्रिकेट स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील संघाने घवघवीत यश संपादन केले.
या संघाने अंतिम सामन्यात नवभारत इंग्लिश स्कूल या संघाला नमवत विजेतेपद पटकावले. या सामन्यात महात्मा गांधी विद्यालय संघाचे प्रणव जगताप, समर्थ जाधव, तन्मय कलाल, समर घाडगे या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
या क्रिकेट संघाला श्री सचिन बलभिम दळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या वतीने संस्थेचे चेअरमन मा. आ. श्री जयवंतराव जगताप साहेब, मा. नगराध्यक्ष श्री वैभवराजे जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री शंभुराजे जगताप, संस्थेचे प्राचार्य श्री अनिस बागवान सर, पर्यवेक्षक श्री. महेश कांबळे सर, पर्यवेक्षीका सौ. नवले मॅडम, सायन्स विभाग प्रमुख श्री विजयकुमार पवार सर, संस्थेतील शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील जिल्हास्तरीय 14 वर्षे वयोगट क्रिकेट स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन श्री पुजारी सर यांनी केले.


