राष्ट्रीय शालेय कूराश स्पर्धेत नगरच्या ऋचा बोगा हिला सिल्व्हर मेडल
राष्ट्रीय शालेय कूराश स्पर्धेत
नगरच्या ऋचा बोगा हिला सिल्व्हर मेडल
एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी
रायपूर छत्तीसगड येथे संपन्न झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय कूराश स्पर्धेत यंग मेन्स ज्युडो असो च्या सिद्धिबाग ज्युडो हॉल मधील कु. ऋचा बोगा हिने महाराष्ट्र संघासाठी ४४ किलो खाली गटात 🥈सिल्व्हर मेडल🥈 मिळविले असून ती इयत्ता ८ वी मध्ये भाऊसाहेब फिरोदिया शाळेत शिकत आहे. तिचे प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर व राष्ट्रीय विजेते आदित्य धोपावकर, महाराष्ट्र कुराश असो चे अध्यक्ष अंकुश नागर,सहाय्यक मार्गदर्शक शुभम दातरंगे महाराष्ट्र कुराश असो ची टेक्निकल डायरेक्टर सोनाली साबळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंचे आमदार संग्राम भैय्या जगताप, नगरसेवक धनंजय जाधव, न्यू लॉ. कॉलेज चे प्राचार्य तांबे सर, संजय धोपावकर सर, मुख्याध्यापक दुगड सर, साबळे सर, गायकवाड सर , करपे सर, राजेंद्र बोगा, राकेश बोगा, निर्मला बोगा, अमर येमूल, ज्ञानेश्वर गालपेल्ली, तसेच सर्व नातेवाईकांनी व शिक्षक वृंदांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .