Breaking
ब्रेकिंग

साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी नवोदित कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत – – पत्रकार विश्वास आरोटे

0 7 6 9 4 3

साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी नवोदित कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत – – पत्रकार विश्वास आरोटे

प्रतिनिधी : राहुल फुंदे

शिर्डी :  जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या साईबाबा संस्थान शिर्डी मध्ये नोकरीच्या माध्यमातून सुलग ४३ वर्ष प्रामाणिकपणे सेवा करुन जगातून येणाऱ्या साई भक्तांची सेवा करत असताना सुरुवातीच्या काळात माफक अशा पगारावर नोकरी करून प्रामाणिकपणा जिद्द सचोटी व कष्टाळू स्वभावामुळे सलग ४३ वर्ष काम करुन सेवानिवृत्त होत असताना अनेक अनुभवाची शिदोरी घेऊन वाटचाल करणारे ही कर्मचारी साईबाबा संस्थान मध्ये काम करत असलेल्या कामगारांचे प्रेरणास्त्रोत ठरतील असा विश्वास सेवानिवृत्त झालेल्या मारुती एकनाथ फुंदे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलताना पत्रकार विश्वास आरोटे शिर्डी येथे आपले मनोगत व्यक्त केली यावेळी राहुल फुंदे सुनीता फुंदे लक्ष्मण झाडे आदित्य झाडे राहुल घुगे दत्तात्रय घुगे आधी सह विविध मान्यवर उपस्थित होते
पत्रकार विश्वास आरोटे म्हणाले की आज समाजात नोकरी निमित्ताने अनेक समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलत आहे एकाच ठिकाणी किंवा एका संस्थेत सलग इतके वर्ष काम करणारी मंडळी दुर्मिळ होत असताना दिसत आहे फुदे यांची जन्मभूमी जरी बीड जिल्ह्यातील आष्टी असली तरी नौकरी निमित्ताने शिर्डीत येऊन कर्मभूमी शिर्डी मानून साईबाबा संस्थान मध्ये नोकरी करत चांगल्या प्रकारची सेवा देऊ सलग ४३ वर्ष देऊन सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या पाठीशी मोठा असलेला अनुभव त्यांनी भविष्यात साईबाबा संस्थानच्या प्रगतीसाठी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली सेवानिवृत्ती निमित्त साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे साई एम्पलाॅईज सहकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमित शेळके राष्ट्रवादीचे राहता तालुक्यातील अध्यक्ष संदीप सोनवणे. यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले नोकरीच्या निमित्ताने सुखदुःखाच्या आठवणी सांगताना मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा कै नंदाबाई फुदे हिने दिलेले पाठबळ व स्व वडील एकनाथ स्व आई ममताबाई यांनी दिलेली प्रामाणिकपणाची शिकवण चांगले संस्कार यामुळे आपण साईबाबा संस्थान मध्ये इतके वर्ष प्रामाणिकपणे काम करू शकलो काम करत असताना शिर्डी ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले त्या सहकार्यामुळेच आपली शिर्डीही कर्मभूमी ठरली असे गौरवोद्गार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे