Breaking
ब्रेकिंग

समाजकार्य संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक कर्डेंची नियुक्ती

0 8 9 6 7 5

समाजकार्य संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक कर्डेंची नियुक्ती

राहुरी तालुका जावेद शेख

सामाजिक, शैक्षणिकसह विविध उपक्रमात नेहमीच सहभाग देत जनतेच्या प्रश्नी समर्पित असणारे उच्चशिक्षित युवा प्रगतशील शेतकरी अशोक कर्डे यांची निर्भय, युवा ग्रामीण पत्रकार संघ प्रणित समाजकार्य संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वसामान्य, वंचित व विद्यार्थी वर्गांतील विविध प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील म्हैसगाव येथील
युवक सामाजिक कार्यकर्ते अशोक कर्डे शासनाच्या वेगवेगळ्या विभागाशी धडपड करून समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. बरोबरच विविध पक्षातील लोकप्रतिनिधींशी सतत संपर्क करुन तात्काळ जनतेचे प्रश्न कसे सुटतील यासाठी अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन निर्भय, युवा ग्रामीण पत्रकार संघाने त्यांची समाजकार्य संघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचलकवार, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले, प्रसिद्ध विचारवंत हनुमंत पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस प्रभावतीताई घोगरे, कोल्हारचे सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, चिंचोलीच्या सरपंच शोभाताई लाटे, राहुरीचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, जिल्हासचिव राजेंद्र म्हसे, महिला अध्यक्ष चैताली हारदे, तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक, राहाता तालुकाध्यक्ष सुभाष कोंडेकर, नेवासा तालुकाध्यक्ष सचिन कुरुंद, पारनेर तालुकाध्यक्ष शरद रसाळ, दिनेश गायकवाड,प्रमोद डफळ, सचिव दिपक मकासरे, अरुण बोरुडे, राजेंद्र परदेशी, राजेंद्र पवार, आप्पासाहेब मकासरे, रमेश जाधव,नानासाहेब विधाटे, सखाहारी काकडे, माजी उपसरपंच भीमाशंकर दुधाट, सिताराम पारधे, प्रंशात दुधाट, सचिन गागरे, बंटीशेट आंग्रे युवा उद्योजक बबुशेट आंग्रे, तसेच जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे