Breaking
ब्रेकिंग

सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार

0 3 9 0 2 1

सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

अहिल्यानगर – प्रशासकीय सेवेत आरोग्य, महसूल व जलसंधारण या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे यांचा वाढदिवसानिमित्त स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सत्कार केला. मूळचे करमाळा (जि. सोलापूर) येथील असलेल्या कवडे यांनी १९८७ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून महसूल खात्यातील कारकिर्दीस सुरुवात केली. कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी प्रांताधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी असताना त्यांनी विविध ठिकाणच्या उद्योग विकासाचे घेतलेले निर्णय चर्चेचे ठरले. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी आपल्या कामकाजाची चुणूक दाखवून दिली आहे.

 स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. शिंदे म्हणाले,  प्रत्येक व्यक्तीने, संस्थेने आपल्या वाटचालीचे अधून-मधून
सिंहावलोकन केले पाहिजे. आपण काय कमावले आणि काय गमावले, याचा ताळेबंद तपासला पाहिजे. काम करत असताना समाधान व आनंद मिळवण्याचा पाया हा प्रामाणिकपणा व आणि सचोटी असला पाहिजे. विश्वास, मन:शांती, समाधान, आनंद हे एकमेकांवर अवलंबून आहेत.याच दृष्टीने आयुक्त कवडे हे काम करत आहेत. प्रामाणिकपणा, सचोटी, पारदर्शकता, कर्तव्यनिष्ठतेच्या माध्यमातून त्यांनी सकारात्मक प्रतिमा तयार केली आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे