Breaking
ब्रेकिंग

आडसूळ पॉलिटेक्निक मधील १५८ विद्यार्थ्याना नोकरी मिळाली

0 3 9 0 4 8

आडसूळ पॉलिटेक्निक मधील १५८ विद्यार्थ्याना नोकरी मिळाली

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

चास, येथील सौ सुंदरबाई माणिक आडसूळ तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या परिसर मुलाखतीमध्ये आडसूळ तंत्रनिकेतनच्या १५८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या विद्यार्थ्यांना विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांनी २.४ पर्यंतचे आरंभीचे पॅकेज जाहीर केले आहे. दर्जेदार शिक्षण पद्धती, संवाद कौशल्य, भरपूर प्रात्यक्षिकाचा सराव व त्यातील विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले सूक्ष्म कौशल्य, औद्योगिक प्रशिक्षण, क्षेत्रभेटी व वेळोवेळी तंत्रनिकेतनने तज्ञ व्याख्यात्यांचे आयोजित केलेले व्याख्याने यांचा प्रचंड फायदा विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये झाल्याची भावना आपल्या मनोगतात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आडसूळ तंत्रनिकेतन मधील स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी व ई .अँड. टी . सी. अभियांत्रिकी विभागातील एकून २१४ विद्यार्थी परिसर मुलाखतीस सामोरे गेले त्या पैकी कॅरियर मीडिया इंडिया प्रा. लि. ने २९ विद्यार्थ्यांची निवड केली.

कायनेटिक वॅट्स अँड होल्टस लिमिटेडने ३० विद्यार्थी, मिटसुबोशि बेलटींग प्रायव्हेट लिमिटेडने ६२ विद्यार्थी, पी. एच. एन्व्हायरमेंटल सोलूशनने १० विद्यार्थी, प्रयाझूअर सॉफ्टवेअर सोलूशनने १७ विद्यार्थी, राजवी टेक्नॉलॉजीने ०३ विद्यार्थी व आर्कस्ट्रक्ट कंपनीने ०७ विद्यार्थी निवडीस पात्र ठरवले असे आडसूळ तंत्रनिकेतन मधून एकूण १५८ विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीतून यशस्वीरित्या निवड करण्यात आली.

पी. एच. एन्व्हायरमेंटल सोलूशनचे सी. ई. ओ. असलेले आर.ए. गांधी, कॅरियर मीडिया इंडिया प्रा. लि. चे एच. आर. मॅनेजर संदीप निकम यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या विविध कौशल्यबाबत माहिती देऊन औद्योगिक क्षेत्रात काम करत असताना उत्तरोत्तर अभियंता म्हणून विकसित होण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले.

याप्रसंगी ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या सचिव सौ. लिनाताई आडसूळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. रमेश गडाख विविध कंपन्यांचे एच‌. आर. मॅनेजर उपस्थित होते. संस्थेच्या सचिव लिनाताई आडसूळ यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून निवड प्रक्रियेसाठी शुभेच्छा दिल्या.

तंत्रनिकेतनचे प्राचार्य गडाख आर. एस‌. यांनी आमचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी नसून तांत्रिक व औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या कौशल्याने परिपूर्ण असल्यामुळेच होणाऱ्या प्रत्येक परिसर मुलाखतीत बहूसंख्येने निवडीस पात्र ठरत आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी फक्त वेतनापुरतं काम न करता औद्योगिक क्षेत्रातले विविध बारकावे, घडामोडी, उत्पादन प्रक्रिया व उत्पादन प्रक्रियेतील समस्या याचा बारकाईने अभ्यास करावा कुशल अभियंता म्हणून नावलौकिक मिळवावा असे प्रतिपादन केले.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, सेक्रेटरी मा. लीनाताई आडसूळ, खजिनदार मा. श्री परमेश्वर आडसूळ, संचालक मा.कृष्णा आडसूळ, प्राचार्य व डायरेक्टर डॉ. प्रदीप एम. पाटील, आडसूळ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य व डायरेक्टर डॉ. संभाजी पठारे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश वायाळ, डॉ. धनंजय लांडगे, डॉ. पंडित पी बी, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ बेग आर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य मा. गडाख आर. एस., प्रशिक्षण व रोजगार आधिकरी प्रा. पवळे एस. एस. , ई. अँड टि. सी. विभाग प्रमुख प्रा.पाळंदे एस . सी., संगणक विभाग प्रमुख प्रा. होले पी .पी. , सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.म्हस्के ए . ए., मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. जाधव एम.बी. , यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका म्हस्के ए. ए. यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे