Breaking
ब्रेकिंग

खेती बचाओ अभियान – बकुपिंपळगाव येथे शेतकरी चर्चासत्र संपन्न

शेती वाचविण्यासाठी शाश्वत जीवनशैलीचा अवलंब आवश्यक: डॉ. कौशिक

0 9 0 0 6 0

खेती बचाओ अभियान – बकुपिंपळगाव येथे शेतकरी चर्चासत्र संपन्न

शेती वाचविण्यासाठी शाश्वत जीवनशैलीचा अवलंब आवश्यक: डॉ. कौशिक

 

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या वतीने ‘खेती बचाओ अभियान’ अंतर्गत बकुपिंपळगाव येथील मारुती मंदिराच्या प्रांगणात गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) रोजी शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पीक आणि पाणी व्यवस्थापनाचे मोलाचे धडे घेतले.

सध्याच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या चर्चासत्रात दुष्काळी परिस्थितीत पीक व पाण्याचे नियोजन, सद्यस्थितीत ऊस, कांदा, तूर आणि हरभरा पिकाचे आधुनिक व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीसाठी जैविक व सेंद्रिय निविष्ठांची शेतावर निर्मिती व त्यांचा योग्य वापर, तसेच सद्य परिस्थितीत ऊस पिकाचे योग्य व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून केव्हीके दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक, विषय विशेषज्ञ इंजि. राहुल एस. पाटील, प्रकाश बहिरट तसेच कृषि विभाग महाराष्ट्र शासन विभागाचे उप-कृषि अधिकारी प्रशांत पाटील, कृषि अधिकारी लक्ष्मण सुडके, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. दिगंबर लोखंडे आणि नेवासा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. शैलेश आहेर, बकुपिंपळगाव चे सरपंचश्री. बापूसाहेब लांडगे माजी उप-सरपंच अरुण हंडाळ, पोलीस पाटील बाबासाहेब कानडे हे उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी स्पष्ट केले की, “कमी पाण्यातही पिकांचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन, सेंद्रिय निविष्ठांचा जास्तीत जास्त वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि जमिनीची सुपीकता वाढवणे काळाची गरज आहे. रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी फुले-स्वामी व गहू पिकासाठी जैवसंतृप्त वाण पुसा- वाणी, पुसा –अहिल्या या नवीन वाणाचा शेतकऱ्यांनी वापर करावा, असे आवाहन डॉ. कौशिक यांनी केले. बकुपिंपळगाव, मडकी, मुरमा, खलाल-पिंपरी या गावात सोयाबीन पिकाचे अधिक क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन मूल्यवर्धित उत्पादने जसे, सोया-मिल्क, टोफू, सोया-वडी इ. साठी लघु-प्रक्रिया उद्योगामध्ये उतरावे असे विषय विशेषज्ञ इंजि. राहुल एस. पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बियाणाची बीज-प्रक्रिया, माती-पाणी परीक्षण आधारित खत व्यवस्थापन ही उत्पादन वाढीची गुरुकिल्ली आहे, यासाठी केव्हीके दहिगाव-ने येथील माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे प्रकाश बहिरट यांनी नमूद केले. कृषी विभागाच्या विविध योजना व सेंद्रिय निविष्ठा निर्मितीबाबतही या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शेतकरी सोन्याबापू मते, कृष्णा कानडे, रामभाऊ दुकले, पोपट जांभळकर, महेश राजेंद्र मते, श्रीधर चंद, पोपटराव शिंदे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बकुपिंपळगाव येथील सेंद्रिय गटाचे शेतकरी तसेच मडकी, मुरमा, खलाल-पिंपरी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे