आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आंतरशालेय क्राॅस कंट्री स्पर्धा संपन्न
आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आंतरशालेय क्राॅस कंट्री स्पर्धा संपन्न
प्रतिनिधी : महेश कांबळे
नगर- सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेत आंतरशालेय क्राॅस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वीचे ४५५ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.या स्पर्धेचा प्रारंभ शाळेचे मुख्याध्यापक,समन्वयक आणि प्राथमिकच्या विभाग प्रमुख यांनी ध्वज दाखवून केला.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ५ कि.मी. तर विद्यार्थिनींनी ४ कि.मी. अंतर धावून यशस्वीपणे पूर्ण केले.
इयत्ता ८ वी ते १० वी या गटात चंद भानुदास याने प्रथम क्रमांक,पानसंबळ यश द्वितीय व थोरात अभय याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता ५ वी ते ७ वी या गटात सिंग आदित्य प्रथम, गलांडेओम द्वितीय व कर्पे ऋत्विक याने तृतीय क्रमांक पटकावला.तर विद्यार्थिनींमध्ये बिडलान इशिका प्रथम,मुसावत निकिता द्वितीय तर काळे वेदांती हिने तृतीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मुख्याध्यापक ,प्राथमिकच्या विभाग प्रमुख ,पर्यवेक्षिका व समन्वयक यांच्या हस्ते सुवर्ण,रजत,कांस्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यशस्वी क्रीडा खेळाडूंचे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ.अनिल आठरे पाटील,कार्यकारी विश्वस्त ॲड.विश्वासराव आठरे पाटील व सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले. सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप दरंदले आणि सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.